जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कातळशिल्पे संरक्षण आणि संवर्धनासाठी शिंदे- फडणवीस सरकारचं मोठं पाऊल

कातळशिल्पे संरक्षण आणि संवर्धनासाठी शिंदे- फडणवीस सरकारचं मोठं पाऊल

कातळशिल्प

कातळशिल्प

राज्यातील महत्वाचे गडकिल्ले आणि कातळशिल्पे जागतिक वारसा यादीत घेण्यासाठी युनेस्कोला विनंती केली आहे. यासंदर्भात स्वत: सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : गड किल्ले किंवा ग्रामीण भागातील दुर्मीळ होत जाणारी कातळ शिल्प जपून ठेवण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील महत्वाचे गडकिल्ले आणि कातळशिल्पे जागतिक वारसा यादीत घेण्यासाठी युनेस्कोला विनंती केली आहे. यासंदर्भात स्वत: सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली आहे. गडकिल्ले आणि कातळशिल्पे संरक्षण आणि संवर्धनासाठी सरकारकडून हे मोठं पाऊल उचलण्यात आलं. राज्यात 14 डोंगरी किल्ले, 8 सागली किल्ले आणि 9 कातळशिल्पांचा या यादीमध्ये समावेश आहे. पर्यटनाच्या दृष्टीनं ही कातळशिल्प फार महत्त्वाची आहेत. संबंधित किल्ले आणि कातळशिल्पे युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झाल्यास पर्यटनाला मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. दुर्लक्षित गडकिल्ले आणि कातळशिल्पांना यामुळे जीवदान मिळेल. शिवाय पर्यटकही मोठ्या प्रमाणात इथे येतील असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात कोकण भागात विशेषतः रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी, लांजा, राजापूर तसेच देवगड आणि सिंधुदुर्ग तालुक्यातील 50 गावांमध्ये छोटी मोठी कातळ शिल्पं आहेत. बारसूला ज्या भागात रत्नागिरीला होणार होता तिथेही कातळशिल्प आहेत असा दावा केला जात आहे. कातळशिल्प नष्ट झाली तर पर्यटनाला त्याचा मोठा फटका बसेल असं स्थानिकांचं म्हणणं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात