• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • ST strike: Sharad Pawar यांच्यासोबतची बैठक संपल्यावर Sanjay Raut यांनी दिली महत्त्वाची माहिती

ST strike: Sharad Pawar यांच्यासोबतची बैठक संपल्यावर Sanjay Raut यांनी दिली महत्त्वाची माहिती

शरद पवारांसोबतची दोन तास बैठक; ST संपाबाबत काय झाला निर्णय? संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती

शरद पवारांसोबतची दोन तास बैठक; ST संपाबाबत काय झाला निर्णय? संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती

Sharad Pawar and Sanjay Raut meeting in Mumbai: शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज शरद पवारांची भेट घेतली.

  • Share this:
मुंबई, 23 नोव्हेंबर : शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास दोन तास चर्चा झाली. या भेटीत एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणि इतरही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. दोन तास चाललेल्या बैठकीनंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले, आज महाराष्ट्रातील विविध विषयांवर चर्चा झाली. महाराष्ट्राच्या प्रश्नांसंदर्भात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्यासंदर्भात चर्चा झाली. शरद पवारांसोबत राज्यातील गंभीर विषयांवरच चर्चा झाली. परमबीर सिंग यांचा विषय शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली जाईल इतका मोठा विषय नाही. शरद पवारांनी सकारात्मक सूचना दिल्या एसटीचा विषय गंभीर आहे. लवकरचं तो विषय सुटेल. एसटी संपाबाबत शरद पवार आणि परिवहन मंत्री यांच्यात चर्चा झाली आहे. लवकरच यातून तोडगा निघेल. आजच्या पवार यांच्या बैठकीतुन असं मला समजलं को त्यांनी सकारात्मक सूचना दिल्या आहेत. वाचा : 'पहाटेच्या शपथविधीला दोन वर्षे, चंद्रकांत पाटलांना त्याचेच झटके येत असतील' : संजय राऊतांचा खोचक टोला वातावरण कोण भडकवत आहे हे सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रातील वातावरण कोण भडकवत आहे आणि का करत आहे हे सर्वांना माहिती आहे. एसटीच्या संपात कोण तेल ओतत आहे हे सर्वांना माहिती आहे. महाराष्ट्राला आग लावण्याचा प्रयत्न अमरावती पासून एसटी संपापर्यत होत आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत सर्वाना सहानुभूती आहे. परमबीर सिंग समोर येऊन बोलत असतील तर ते ऐकून घेण्यात येईल. ते आता आरोपी आहेत. आणि ज्याच्यावर आरोप आहेत तो असं बोलत असेल तर त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांची प्रकृती झपाट्याने सुधारतेय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्र्यांची तब्येत झपाट्याने सुधारत आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते विश्रांती घेत आहेत. लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. हे सरकार पुढील 25 वर्षे टिकेल संजय राऊत म्हणाले, चंद्रकांत पाटील यांनी आतापर्यंत 28 वेळा विधान केलं आहे की, हे सरकार जाईल म्हणून. चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्रात भाजपचे अध्यक्ष आहेत, त्यांनी असं बोलणं गरजेचं आहे. त्यांच्या बोलण्याने हे सरकार काही जात नाही. हे सरकार पुढील 25 वर्षे टिकेल आणि या सरकारचं पावर स्टेशन मी आत्ता जिथे आहे तेथे आहे.
Published by:Sunil Desale
First published: