• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • 'पहाटेच्या शपथविधीला दोन वर्षे, चंद्रकांत पाटलांना त्याचेच झटके येत असतील' : संजय राऊतांचा खोचक टोला

'पहाटेच्या शपथविधीला दोन वर्षे, चंद्रकांत पाटलांना त्याचेच झटके येत असतील' : संजय राऊतांचा खोचक टोला

'पहाटेच्या शपथविधीला दोन वर्षे, चंद्रकांत पाटलांना त्याचेच झटके येत असतील' : संजय राऊतांचा खोचक टोला

'पहाटेच्या शपथविधीला दोन वर्षे, चंद्रकांत पाटलांना त्याचेच झटके येत असतील' : संजय राऊतांचा खोचक टोला

Sanjay Raut on Chandrakant Patil : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज भाजप आणि चंद्रकांत पाटलांवर पहाटेच्या शपथविधी तसेच एसटी संपावरुन निशाणा साधला आहे.

  • Share this:
मुंबई, 23 नोव्हेंबर : संजय राऊत (Sanjay Raut) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात आज जवळपास दोन तास बैठक झाली. या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये विविध मुद्दयांवर चर्चा झाली. एसटी संपाच्या (ST employees strike) संदर्भात सुद्धा बैठकीत चर्चा झाली. या बैठकीनंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. (Sanjay Raut takes dig on Chandrakant Patil over mva government fall soon statement) हे सरकार पुढील 25 वर्षे टिकेल संजय राऊत म्हणाले, चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)  यांनी आतापर्यंत 28 वेळा विधान केलं आहे की, हे सरकार जाईल म्हणून. चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्रात भाजपचे अध्यक्ष आहेत, त्यांनी असं बोलणं गरजेचं आहे. त्यांच्या बोलण्याने हे सरकार काही जात नाही. हे सरकार पुढील 25 वर्षे टिकेल आणि या सरकारचं पावर स्टेशन मी आत्ता जिथे आहे तेथे आहे. चंद्रकांत पाटलांना शपथविधीचे झटके पहाटेच्या शपथविधीला आज दोन वर्षे होत आहेत. बहूतेक त्याच शपथविधीचे झटके चंद्रकांत पाटलांना बसत असावेत आणि म्हणून ते सारखं बोलत आहेत की, सरकार पडेल, सरकार पडेल. झोपेतून जागे व्हा इतकेच मी त्यांना सांगू इच्छितो असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. वाचा : शरद पवारांसोबतची बैठक संपल्यावर Sanjay Raut यांनी दिली महत्त्वाची माहिती शरद पवारांसोबत बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा संजय राऊत म्हणाले, आज महाराष्ट्रातील विविध विषयांवर चर्चा झाली. महाराष्ट्राच्या प्रश्नांसंदर्भात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्यासंदर्भात चर्चा झाली. शरद पवारांसोबत राज्यातील गंभीर विषयांवरच चर्चा झाली. परमबीर सिंग यांचा विषय शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली जाईल इतका मोठा विषय नाही. शरद पवारांनी सकारात्मक सूचना दिल्या एसटीचा विषय गंभीर आहे. लवकरचं तो विषय सुटेल. एसटी संपाबाबत शरद पवार आणि परिवहन मंत्री यांच्यात चर्चा झाली आहे. लवकरच यातून तोडगा निघेल. आजच्या पवार यांच्या बैठकीतुन असं मला समजलं को त्यांनी सकारात्मक सूचना दिल्या आहेत. वातावरण कोण भडकवतंय? महाराष्ट्रातील वातावरण कोण भडकवत आहे आणि का करत आहे हे सर्वांना माहिती आहे. एसटीच्या संपात कोण तेल ओतत आहे हे सर्वांना माहिती आहे. महाराष्ट्राला आग लावण्याचा प्रयत्न अमरावती पासून एसटी संपापर्यत होत आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत सर्वाना सहानुभूती आहे. परमबीर सिंग समोर येऊन बोलत असतील तर ते ऐकून घेण्यात येईल. ते आता आरोपी आहेत. आणि ज्याच्यावर आरोप आहेत तो असं बोलत असेल तर त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Published by:Sunil Desale
First published: