कहर! शक्ती मिल गँगरेप प्रकरणातल्या या 'अल्पवयीन' गुन्हेगाराची तुरुंगातून सुटल्यावरही दहशत कायम

कहर! शक्ती मिल गँगरेप प्रकरणातल्या या 'अल्पवयीन' गुन्हेगाराची तुरुंगातून सुटल्यावरही दहशत कायम

Shakti Mill Gangrape Case: मुंबईतलं हे बलात्कार प्रकरण कोर्टात दाखल झालं तेव्हा हा अल्पवयीन म्हणून किरकोळ शिक्षा मिळाली होती. आता काही गंभीर गुन्ह्यांसाठी पोलिसांनी त्याला पुन्हा एकदा अटक केली आहे.

  • Share this:

मुंबई, 03 मार्च: देशाला हादरून सोडणाऱ्या निर्भया बलात्कार (Nirbhaya Gang rape) प्रकरणानंतर मुंबईतील शक्ती मिल बलात्कार प्रकरण (Shakti Mills Gang rape case) देशात खूपचं गाजलं होतं. बलात्काराच्या या गंभीर प्रकरणाने देशाला दुसरा जबरदस्त धक्का दिला होता. या घटनेनं संपूर्ण देश पेटून उठला होता, देशात विविध ठिकाणी आंदोलनं झाली होती. गुन्हेगारांना फाशी (Death Penalty) देण्यात यावी, अशी मागणी देशभरातील विविध संघटनांनी केली होती. या हाय प्रोफाइल केस मधील अल्पवयीन आरोपी आकाश जाधव (Minor Accused Akash Jadhav) याची न्यायालयाने जामीनावर सुटका (Release on bail) केली होती. गुन्हा घडला त्या वेळी तो अल्पवयीन असल्याने त्याचं नावही जाहीर झालं नाही आणि किरकोळ शिक्षेवर त्याला सोडण्यात आलं. आता तोच आकाश जाधव अट्टल गुन्हेगार म्हणून दहशत पसरवत आहे.

अल्पवयीन असल्याने हाय प्रोफाइल केसमधून सुखरूप सुटका झाल्यानंतरही त्याची गुन्हे करण्याची खोड मोडलेली नाही. त्याचे अवैध उद्योग सुरूच आहेत. त्याने मुंबईच्या या परिसरात अनेक गंभीर गुन्हे केले असून स्वतः च्या नावाची दहशत पसरवली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अखेर त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

शक्ती मिल प्रकरणातील तत्कालीन अल्पवयीन गुन्हेगार आकाश श्रीधर जाधव आता  25 वर्षांचा झाला आहे. त्याने स्वतः ची गँग बनवून परिसरात दहशत पसरवली होती. दोन व्यक्तींची हत्या केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. याशिवाय धमकावणे, गंभीर दुखापत करणे, मारहाण करणे, खंडणी गोळा करणे, असे अनेक गंभीर आरोप त्याच्यावर आहेत. तुरुंगातून सुटका झाल्यानंतरही त्याने हे गंभीर गुन्हे केले आहेत. शक्ती मिल गँगरेप प्रकरणात आकाश जाधव हा अल्पवयीन गुन्हेगार होता. त्यामुळे न्यायालयाने याला कठोर शिक्षा न देता, काही दिवस तुरुंगात ठेवल्यानंतर जामीनावर त्याची सुटका केली होती.

हे ही वाचा- शक्ती मिल प्रकरणातील बलात्काऱ्यांना फाशीचं, उच्च न्यायालय निर्णयावर ठाम

शक्ती मिल प्रकरण

मुंबईतील शक्ती मिल याठिकाणी 22 ऑगस्ट 2013 रोजी एका महिला वृत्तछायाचित्रकारावर सहा जणांनी बलात्कार केला होता. तर पीडितेच्या साथीदारालाही मारहाण केली होती. या सामुहिक बलात्कार प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने तीन आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. तर एकाला आजीवन कारावास ठोठावला होता. याप्रकरणात आणखी दोन अल्पवयीन आरोपींचा समावेश होता. या दोन्ही अल्पवयीन आरोपींना 3 वर्षांसाठी बालसुधार कारागृहात पाठवलं होतं. या अल्पवयीन गुन्हेगारांमध्ये आकाश जाधव याचाही समावेश होता.

हे ही वाचा- प्रियकराची हत्या करण्यासाठी तरुणीने दिली SEXची ऑफर आणि पैसे, आरोपीचा खुलासा

न्यायालयाने आकाश जाधवची जामीनावर सुटका केल्यानंतरही तो गुन्हेगारी विश्वात कायम राहिला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी त्याला विविध गुन्ह्यांमध्ये पुन्हा अटक केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे.

Published by: News18 Desk
First published: March 3, 2021, 7:55 PM IST

ताज्या बातम्या