मुंबई, 03 जून : मुंबईतील शक्ति मिल सामुहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींची फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयानं कायम ठेवली आहे. यावेळी गुन्हेगारांना सुनावलेली शिक्षा ही कायद्याचा चौकटीत बसणारी असल्याचं देखील न्यायालयानं म्हटलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयानं राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. शक्ति मिल सामुहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींनी 376 कलमातील सुधारणेला आव्हान दिलं होतं. पण, हे आव्हान न्यायालयानं फेटाळून लावलं आहे. त्यामुळे आरोपींना सुनावलेली फाशीची शिक्षा निश्चित करण्यासाठीच्या सुनावणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
इंदिरा गांधींच्या पुतळ्याला घातला बुरखा; काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक
काय आहे प्रकरण?
22 ऑगस्ट 2013 रोजी मुंबईतील शक्ति मिल येथे महिला छायाचित्रकारावर सात जणांकडून सामुहिक बलात्कार करण्यात आला होता. अटक केलेल्यांमध्ये एक जण अल्पवयीन आरोपी होता. सुनावणीदरम्यान न्यायालयानं आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. छायाचित्रकारावर झालेल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेनंतर टेलिफोन ऑपरेटरवर देखील बलात्कार झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेनं मुंबई हादरून गेली होती. शिवाय, महिला सुरक्षेचा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात चर्चिला गेला होता.
शिक्षेला आरोपींना न्यायालयात आव्हान दिलं. पण, न्यायालयानं ठोठावलेली फाशीची शिक्षा कायम ठेवली.
VIDEO : भाजप आमदाराकडून राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण