जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / प्रियकराची हत्या करण्यासाठी तरुणीने दिली SEXची ऑफर आणि पैसे, आरोपीचा धक्कादायक खुलासा

प्रियकराची हत्या करण्यासाठी तरुणीने दिली SEXची ऑफर आणि पैसे, आरोपीचा धक्कादायक खुलासा

प्रियकराची हत्या करण्यासाठी तरुणीने दिली SEXची ऑफर आणि पैसे, आरोपीचा धक्कादायक खुलासा

Nagpur Murder Case : प्रेयसीचे बिंग फुटल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात चार आरोपींना अटक केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

तुषार कोहळे, नागपूर, 3 मार्च : लग्नाला अडथडा ठरणाऱ्या प्रियकराचा काटा काढण्यासाठी प्रेयसीने (Love Affair) आरोपीला दीड लाख रुपये आणि शरीससुखाच्या बदल्यात हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना नागपूरच्या (Nagpur Murder) कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीत सालईमेंढा गावात घडली. प्रेयसीचे बिंग फुटल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात चार आरोपींना अटक केली आहे. नागपूर जिल्ह्यातील कुही पोलीस स्टेशन हद्दीतील सालईमेंढा परिसरात पाचगावातील एक प्रेत एका खाणीमध्ये पडून आहे अशी माहिती कुही पोलीसांना मिळाली होती. त्यांनतर पोलिसांनी घटनास्थळावर गाठून तपासणी केली असता चंदु महापुरे याचे 25 फुट खाणीत प्रेत संशयास्पद स्थितीत पडून असल्याचे पोलिसांना दिसले. त्यावरून पोलीसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली असता मृतकाचे प्रेत असलेल्या ठिकाणापासून 70 मीटर अंतरावर रक्ताचा सडा पडलेला दिसला. त्यावरून कुही पोलिसांना घातपात झाल्याचा संशय आल्याने त्यांनी तात्काळ तपास यंत्रे फिरवून व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून अवघ्या 12 तासात संशयित इसम भारत गुजर याला ताब्यात घेतले. सुरुवातीला आरोपी भारत गुजर हा उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागला होता. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच भारतने गुन्ह्याची कबुली देत स्वत:च्या मोटारसायकलने मृतकास निर्जन स्थळी नेऊन दगडाने डोके ठेचले व चाकूने मृतकाचा गळा कापून हत्या केल्याचे कबूल केले. पोलिसांनी आरोपीला हत्येचे कारण विचारले असता त्याने धक्कादायक खुलासा केला आहे. मृतक चंदू हा विवाहित असून त्यांचे गावातल्या एक मुलीसोबत अनैतिक संबंध होते. त्या मुलीचे लग्न जुळल्यानंतर मुलीच्या घरच्यांनी मृतकाला तिच्यापासून दूर राहण्याचे सांगितले. मात्र मृतक ऐकाला तयार नव्हता. त्यामुळे प्रेयसीने भारत गुजरला हाताशी पडून दीड लाख रुपये व शरीरसुख देण्याच्या बदल्यात चंदूची हत्या करण्याची सुपारी दिली. त्यांनतर आरोपी भारत गुजरने मृतक चंदू महापूरे याला दारू पाजून त्याची हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले. दरम्यान, या प्रकरणात आरोपीविरूद्ध पोलीस स्टेशन कुही येथे कलम 302, 201भादवी अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी भारत गुजर , प्रेयसी व तिच्या आईवडिलांना अटक करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात