जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / 'ती' गोल्डन गँग कोण, संजय राऊतांचा रोख कुणाकडे? नेमका काय प्रकार?

'ती' गोल्डन गँग कोण, संजय राऊतांचा रोख कुणाकडे? नेमका काय प्रकार?


मुळात त्यांना कोणी मुख्यमंत्री मानत नाहीत. हे खूपच दुदैवी आहे की महाराष्ट्राचे नाव 10 मध्ये ही नाही. म

मुळात त्यांना कोणी मुख्यमंत्री मानत नाहीत. हे खूपच दुदैवी आहे की महाराष्ट्राचे नाव 10 मध्ये ही नाही. म

मुळात त्यांना कोणी मुख्यमंत्री मानत नाहीत. हे खूपच दुदैवी आहे की महाराष्ट्राचे नाव 10 मध्ये ही नाही.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 13 फेब्रुवारी : या गोल्डन गँगचे काम लवकरच कळेल सगळ्या महाराष्ट्राला. आता मी बोलत नाहीत. मंत्र्याचा बंगल्यावर, मंत्रालयात आणि बाहेर सुद्धा. हळूहळू मी समोर आनेन. माझे पत्रकारांना आवाहन आहे की त्यांनी शोध घ्यावा या टोळीचा, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गट आणि भाजपवर निशाणा साधला. भगतसिंग कोश्यारी यांनी राजीनामा दिल्यामुळे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून टीका करण्यात आली. त्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना राऊतांनी पुन्हा एकदा गोल्डन गँगचा उल्लेख केला. मुळात त्यांना कोणी मुख्यमंत्री मानत नाहीत. हे खूपच दुदैवी आहे की महाराष्ट्राचे नाव 10 मध्ये ही नाही. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कायम एक प्रगतीशील राज्य म्हणून गणने गेले आजवर. आज महाराष्ट्र दिल्लीच्या खिजगणितीत नाही. हे सरकार पाडण्यात आले आगे तेच महाराष्ट्राचे पंख छाटण्यासाठी. हे फक्त दिल्लीची हस्तक बसवल्यामुळे उताराला लागलेली गाडी आहे, अशी टीका संजय राऊत यांनी शिंदे गटावर केली. (BMC निवडणुकीचं महाभारत! ‘फडणवीस रथ सारथी तर अर्जुन…’, काय म्हणाले बावनकुळे?) राहुल गाधी यांना नोटीस बजावायचं काही कारण नाही. त्यांनी ज्याबद्दल जे प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर द्यायला हवे होते. त्यांना संधी होती. खरंतर त्यांनी हक्कभंग केला आहे सभागृहाचा आणि आमचा . हक्कभंग त्यांनी लोकभावनेचा भंग केला. हा पलायनवाद आहे पळपुटेपणाच आहे. तुम्हा नियमांचा आधार घेवून नोटीसा पाठवत आहात हीच हुकूमशाही आहे, अशी टीकाही राऊतांनी केली. ‘ते कोणताही ठराव करू शकतात ते 150 चं काय 450 चा पण आकडा देवू शकतात. पण मुंबई महापालिका, ठाणे महापालिका जिथे सेनेचा झेंडा होता. तिथे शिवसेनेच विजयी होईल याची आम्हाला खात्री आहे. जो मुख्यमंत्री पहिल्या 10 येत नाही त्याच्या नेतृत्वात भाजप निवडणूक जिंकूच शकत नाही, असा टोला संजय राऊतांनी भाजपला लगावला. (Shinde Camp MLA Dance : देख रहा है बिनोद, ठाकरेंच्या शिलेदारासोबत एकनाथ शिंदेंचे खास आमदार थिरकले, video) ज्या काय ज्या प्रकारची वक्तव्य देवेंद्र फडणवीस, नारायण राणे आणि मिंधे गटाचे लोक करत आहेत. निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय यांचे निकाल मिधे गटाच्याच बाजूने बोलत आहे. यावरून तुम्ही त्याना विकत घेतले आहे का ? असा सवाल ही राऊतांनी केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात