जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / BMC निवडणुकीचं महाभारत! 'फडणवीस रथ सारथी तर अर्जुन...', काय म्हणाले बावनकुळे?

BMC निवडणुकीचं महाभारत! 'फडणवीस रथ सारथी तर अर्जुन...', काय म्हणाले बावनकुळे?

BMC निवडणुकीचं महाभारत! 'फडणवीस रथ सारथी तर अर्जुन...', काय म्हणाले बावनकुळे?

भाजपच्या मुंबई महापालिकेच्या मिशन 150 ला सुरूवात झाली आहे. दादरच्या वसंत स्मृती कार्यालयामध्ये दहिसर ते दक्षिण मुंबई भागातील नेते आणि कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश झाले.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 12 फेब्रुवारी : भाजपच्या मुंबई महापालिकेच्या मिशन 150 ला सुरूवात झाली आहे. दादरच्या वसंत स्मृती कार्यालयामध्ये दहिसर ते दक्षिण मुंबई भागातील नेते आणि कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश झाले. या कार्यक्रमात भाजप मुंबईचे प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी मिशन 150 ची घोषणा दिली. भाजप मुंबई कार्यकारिणीमध्ये मिशन 150 चा ठरावही मंजूर करण्यात आला. भाजप, एकनाथ शिंदेंची बाळासाहेबांची शिवसेना आणि एनडीए सदस्य यांचं हे एकत्रित मिशन असेल, असंही आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं. भाजपच्या मुंबईच्या या मिशनमध्ये रथ सारथी देवेंद्र फडणवीस असतील तर आशिष शेलार अर्जुन आणि समोर बसलेले सगळे नेते पांडव आहेत, असा उल्लेख भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. मुंबई महापालिकेत आपल्याला आपला महापौर बसवायचा आहे, हेच विचार घेऊन आपल्याला इथून जायचं आहे, असंही बावनकुळे म्हणाले. ‘निवडणुकीच्या तयारीला लागा, संकल्पपूर्ती हेच आपलं लक्ष्य आहे. कुठलंही युद्ध आपण जिंकू शकतो. आता कुठला भ्रष्टाचार काढतील, अशी किरीट सोमय्यांची विरोधकांना धडकी भरते. उद्धव ठाकरे यांच्या गटाला महाराष्ट्रात गळती लागली आहे. किंचित सेनेला आता वंचित सेनेशी युती करावी लागतेय. आजकाल किंचित सेना कुठेही फिरतेय, उद्या कदाचित ओवेसीकडेही जातील. किंचित सेनेला वैतागून अनेक लढवय्ये भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. सरकार जाण्याचं दुसरं कोणतंही कारण नव्हतं, उद्धव ठाकरे यांच्या खिशात पेन नव्हतं, हेच कारण ठरलं,’ असा टोला बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लगावला. शेलारांचाही घणाघात दरम्यान या कार्यक्रमात आशिष शेलार यांनीही शिवसेना ठाकरे गटावर घणाघाती टीका केली. ‘मुंबईकरांसाठी एकही गोष्ट केली नाही. बालहट्टासाठी पेंग्विन आणले आणि त्यातही भ्रष्टाचार केला. भाजप कार्यकर्ता हा मुंबईकरांचा सेवक आहे. गडकरींनी पूल बांधले, गोपीनाथ मुंडेंनी गँगवॉरमुक्त मुंबई केली. देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो दिली. तुम्ही शिव्याशाप देऊन मीडियावर लढाई लढा. भाजप कार्यकर्ता बूथवरील लढाई लढणार,’ असं आशिष शेलार म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP , BMC , mumbai
  • First Published :
जाहिरात
जाहिरात