• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • Mumbai Local आता विद्यार्थ्यांसाठीही खुली! मिळणार महिन्याचा पास; अशी आहे प्रक्रिया

Mumbai Local आता विद्यार्थ्यांसाठीही खुली! मिळणार महिन्याचा पास; अशी आहे प्रक्रिया

मुलांची सुरक्षा लक्षात घेऊन बहुतांश ठिकाणी आतापर्यंत शाळा, कॉलेजेस बंदच ठेवण्यात आली होती. सर्व शिक्षण ऑनलाइन पद्धतीनं सुरू होतं. मात्र आता हळूहळू शाळा-महाविद्यालयातही विद्यार्थ्यांसाठी खुली होत आहे.

  • Share this:
मुंबई, 21 ऑक्टोबर: गेल्या दीड वर्षापासून बंद असलेली शाळा, कॉलेजेस (Schools and Colleges reopening) आता सुरू होत आहेत. देशभरात लसीकरणाचे (Vaccination Drive in India) प्रमाण वाढल्याने आणि कोरोनाची दुसरी लाट संपत (Second Wave of Coronavirus) आल्याने कोरोना सुरक्षेचे नियम शिथिल करण्यात येत आहेत. मुलांची सुरक्षा लक्षात घेऊन बहुतांश ठिकाणी आतापर्यंत शाळा, कॉलेजेस बंदच ठेवण्यात आली होती. सर्व शिक्षण ऑनलाइन पद्धतीनं सुरू होतं. कोरोना काळात महाराष्ट्रात (Coronavirus in Maharashtra) विशेषतः मुंबईसारख्या (Mumbai Corona Update) अफाट गर्दीच्या शहरात कोरोनाने सर्वाधिक कहर केला होता. कोरोनाच्या विक्रमी रुग्ण संख्येमुळे मुंबईत कडक निर्बंध लादण्यात आले होते. त्यात लोकलमधून प्रवासासही अत्यावश्यक सेवांमधील लोकांनाच परवानगी देण्यात आली होती. नंतर 15 ऑगस्ट 2021पासून राज्य सरकारने लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकल ट्रेनमधून (Local Train) प्रवासासाठी परवानगी दिली होती. मात्र शाळा, कॉलेजेस बंदच ठेवण्यात आले होते. आता मुंबईत स्थिती सुधारल्यानं अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यात सर्वत्र तसंच मुंबईत शाळा, कॉलेजेस सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. वाचा-"हिंमत असेल तर शिंगावर घ्या, दिवस आणि वेळ कळवा" राणेंचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार मुंबईतील कॉलेजेसना ऑफलाइन वर्ग पुन्हा सुरू करण्यास मान्यता मिळाली असली तरी विद्यार्थांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन अभ्यासाचा असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. शाळा, कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आता लोकल रेल्वेमधून प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या आणि लसीकरणासाठी पात्र नसलेल्या शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही बुधवारपासून (20 ऑक्टोबर 21) लोकल ट्रेनने प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. वाचा-शिवसेनेनं कसली कंबर, मुंबईतील शाखा होणार हायटेक, आदित्य ठाकरेंनी दिली नवी आयडिया मात्र रेल्वे अधिकारी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड (Aadhaar Card) आणि शाळेचे ओळखपत्र (School ID) तपासून मगच त्यांना स्टेशनवर प्रवेश देणार आहेत. रेल्वे प्रवासासाठीची तिकिटे फक्त काउंटरवर दिली जातील. विद्यार्थ्यांना महिन्याचा पास (Monthly Pass)दिला जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना कोणत्याही लोकल स्टेशनवर (Local Station) जाऊन आपल्या आधार कार्ड आणि शाळेच्या ओळखपत्राची तपासणी झाल्यानंतर तिकीट काउंटरवर जाऊन आपल्या मार्गानुसार महिन्याचा पास घेता येईल. विद्यार्थ्यांना दररोज तिकीट काढण्यासाठी गर्दीत उभं राहावं लागू नये यासाठी ही सुविधा देण्यात आली आहे. एकाचवेळी महिन्याचा पास घेऊन विद्यार्थी महिनाभर आरामात प्रवास करू शकतील.
First published: