भाजपचे 75 आमदार शिवसेनेच्या संपर्कात? काय म्हणाले संजय राऊत!

भाजपचे 75 आमदार शिवसेनेच्या संपर्कात? काय म्हणाले संजय राऊत!

'अशा हवेतल्या गप्पा या काळात होत असतात पण त्याला काहीही अर्थ नसतो.'

  • Share this:

मुंबई 29 ऑक्टोंबर : सत्तावाटपावरून भाजप आणि शिवसेनेत सध्या रस्सीखेच सुरू आहे. पडद्यामागे असणाऱ्या या स्पर्धेवर आता उघडपणे  चर्चा होत असून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज यावरून मुख्यमंत्र्यांवर थेट निशाणा साधलाय. सत्तावाटपाचं काहीच ठरलं नव्हतं असं मुख्यमंत्री म्हणत असतील तर असे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लखलाभ असा टोलाही त्यांनी लगावला. शिवसेनेचे 45 आमदार संपर्कात असल्याचा दावा भाजपचे खासदार संजय काकडे यांनी केला होता. त्यावर राऊत यांनी फिरकी घेतली. संजय काकडे यांना यावर बोलण्याचा काहीही अधिकार नाही असंही ते म्हणाले.संजय राऊत पुढे म्हणाले, मी शिवसेनेची अधिकृत भूमिका मांडतो. भाजपचे 75 आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहेत असं मी म्हणालो तर तुम्ही विश्वास ठेवणार का? असा सवाल त्यांनी उपहासाने विचारला.

भाजप-शिवसेनेत मतभेद, सत्तावाटपाची पहिलीच बैठक रद्द

अशा हवेतल्या गप्पा या काळात होत असतात पण त्याला काहीही अर्थ नसतो असंही ते म्हणाले. काहीच ठरलं नव्हतं असं भाजप म्हणत असेल तर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीवेळी युती कुठल्या आधारावर झाली ते तरी जाहीर असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

काय म्हणाले संजय काकडे?

भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी मंगळवारी एक खळबळजनक दावा केला आहे. शिवसेनेच्या तब्बल 45 आमदारांना भाजपसोबत येऊन सरकार स्थापन करण्यास उत्सुक आहेत. एका वृत्तवाहिनीशी बोलताा काकडे यांनी हा दावा केला आहे.यासंदर्भातील वृत्त ANI या वृत्तसंस्थेने देखील दिले आहे. काकडे म्हणतात, शिवसेनेच्या 56 पैकी 45 आमदारांनी भाजपसोबत सरकार स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हे सर्व आमदार आम्हाला (भाजपला) फोन करत आहेत आणि सरकारमध्ये सहभागी होण्याबद्दल इच्छा व्यक्त करत आहेत.

निवडणुकीत 'लढणा'रे दोन नेते जेव्हा समोरासमोर येता तेव्हा...

या सर्व आमदारांचे असे म्हणणे आहे की, काहीही झाले तरी शिवसेनेने सरकारमध्ये सहभागी झाले पाहिजे. शिवसेनेच्या 45 आमदारांनी भाजपसोबत सरकार स्थापन करावी असे म्हटल्याचे काकडे यांनी सांगितले. राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत 288 पैकी भाजपला 105 तर शिवसेनेला 56 जागा मिळाल्या आहेत. दोन्ही पक्षांमध्ये सरकार स्थापनेसंदर्भात चर्चा सुरु होण्याआधीच वाद सुरु झाला आहे. निकालात 2014च्या तुलनेत भाजपच्या आमदारांची संख्या कमी झाल्याने शिवसेनेने सत्तेत बरोबरीचा वाटा मागितला आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 29, 2019, 5:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading