निवडणुकीत 'लढणा'रे दोन नेते जेव्हा समोरासमोर येता तेव्हा...

निवडणुकीत 'लढणा'रे दोन नेते जेव्हा समोरासमोर येता तेव्हा...

निवडणुकीत एकमेकांविरोधात फटाके लावणारे नेते जेव्हा समोरासमोर येतात तेव्हा नेमकं काय झालं त्याची उत्सुकता सर्वांनाच असते.

  • Share this:

पुणे 29 ऑक्टोंबर : विधानसभा निवडणुकीत सर्वच पेक्षांच्या नेत्यांमध्ये घनघोर हल्लाबोल झाला. आरोप-प्रत्यारोपांच्यांच्या झडी लागल्या. एकमेकांच्या विरोधात फटाके फोडले गेले, सुरूंग लावले गेले. नंतर निकाल लागला आणि जनतेनं प्रत्येकाला आपली जागा दाखवून दिली. युतीला बहुमत तर दिलं पण त्यांनी जे पाशवी बहुमताचे दावे केले होते तेवढं काही दिलं नाही तर काँग्रेस-राष्ट्रवादीला संपवू असं जे म्हटलं गेलं ते न होता दोन्ही पक्षांची ताकद वाढली. निकालानंतर राजकीय धुराळा खाली बसला आणि दिवाळी फराळासाठी सर्वच पक्षांचे नेते एकत्र येऊ लागले. पुण्यातले शिवसेनेचे आमदार विनायक निम्हण यांच्या घरी दिवाळी फराळाचं आयोजन आज करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात भाजपचे कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे आले समोरासमोर आले. अमोल कोल्हे यांनीही पुणे भागात सभा घेऊन गाजवल्या होत्या. 2019 च्या मोदी लाटेतही अमोल कोल्हे निवडून आले होते. त्यामुळे त्यांची निवडणूक गाजली होती.

विविध राजकीय पक्षांचे नेते एकत्र आल्याने सर्वांचाच गप्पांचा फड जमला. आरोप-प्रत्यारोप करणारे नेते खेळी मेळीच्या वातावरणात गप्पा करतांना बघून कार्यकर्त्यांनाही आनंद झालं. भाजपचे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी वडगावशेरी मतदारसंघात भाजपच्या जगदीश मुळीक यांचा पराभव करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित आमदार सुनील टिंगरे यांचा केला सत्कार राजकारणापलीकडे जात खेळीमेळीच्या वातावरणात गप्पा रंगल्या  आणि जोडीला दिवाळी फराळ असल्यानं राजकीय नेत्यांनाही दररोजच्या धबडग्यातून काही निवांत क्षण अनुभवता आलेत.

भाजप-शिवसेना बैठक रद्द

सत्तावाटपावरून भाजप आणि शिवसेनेत मतभेद निर्माण झाले आहेत. याचा थेट उदाहरण आज समोर आलं. अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घेणार असं काही माझ्या समोर ठरलं नव्हतं असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर शिवसेना आक्रमक झालीय. लोकसभच्या वेळी जर काहीच फॉर्म्युला ठरला नव्हता तर चर्चा काय करायची अशी भूमिका घेत शिवसेनेने आज होणारी दोन्ही पक्षांची बैठक रद्द केल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिलीय. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे भाजपवरचा दबाव वाढणार आहे. सत्तावाटपाचं काहीच ठरलं नव्हतं असं जर मुख्यमंत्री म्हणत असतील तर असे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लखलाभ असो असा खोचक टोलाही संजय राऊत यांनी लगावलाय. ते म्हणाले, दोन्ही पक्षांचे दोन दोन नेते आज प्राथमिक चर्चेला बसणार होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही बैठक रद्द केल्याचं संजय राऊत यांनी सांगितलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 29, 2019 04:59 PM IST

ताज्या बातम्या