मुंबई 29 ऑक्टोंबर : सत्तावाटपावरून भाजप आणि शिवसेनेत मतभेद निर्माण झाले आहेत. याचा थेट उदाहरण आज समोर आलं. अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घेणार असं काही माझ्या समोर ठरलं नव्हतं असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर शिवसेना आक्रमक झालीय. लोकसभच्या वेळी जर काहीच फॉर्म्युला ठरला नव्हता तर चर्चा काय करायची अशी भूमिका घेत शिवसेनेने आज होणारी दोन्ही पक्षांची बैठक रद्द केल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिलीय. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे भाजपवरचा दबाव वाढणार आहे. सत्तावाटपाचं काहीच ठरलं नव्हतं असं जर मुख्यमंत्री म्हणत असतील तर असे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लखलाभ असो असा खोचक टोलाही संजय राऊत यांनी लगावलाय. ते म्हणाले, दोन्ही पक्षांचे दोन दोन नेते आज प्राथमिक चर्चेला बसणार होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही बैठक रद्द केल्याचं संजय राऊत यांनी सांगितलंय. शरद पवारांच्या ‘त्या’ पाऊस भाषणावर मुख्यमंत्र्यांनी केली खोचक टीका! दरम्यान, वर्षा बंगल्यावरही राजकीय घडामोडी वेग आलाय. मुख्यमंत्री देंवेंद्र फडवणीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय निरिक्षक भुपेंद्र यादव यांच्या बैठक सुरू आहे. भाजपा विधीमंडळ नेता निवड आणि शिवसेना सोबत युती यावर चर्चा होणार आहे.
युतीच्या फॉर्म्युल्यावरून शिवसेनेची आक्रमक भूमिका, निवडणार दुसरा पर्याय? सत्तास्थापनेचा 31 ऑक्टोबरचा मुहूर्त टळणार? एका वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार 1 किंवा 2 नोव्हेंबरला अमित शहा मुंबईत येणार आहेत. त्यानंतरच महायुतीच्या वाटाघाटी ठरतील. भाजप पक्षाध्यक्ष शहा यांच्या भेटीअगोदर युतीचं सत्तावाटपचं सूत्र ठरणं आवश्यक आहे. तरच पुढचा मार्ग मोकळा होईल. भाजप- शिवसेनेदरम्यानची ही चर्चा कधीपर्यंत चालणार हे निश्चित नाही. दरम्यान भाजपच्या विधीमंडळ नेतानिवडीसाठीची बैठक उद्या म्हणजे बुधवारी होणार आहे. विधीमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड होण्याची शक्यता आहे.