Home /News /mumbai /

जमीन घोटाळा प्रकरण: आता या तारखेला चौकशीसाठी हजर राहणार संजय राऊत; ED ने वाढवून दिली वेळ

जमीन घोटाळा प्रकरण: आता या तारखेला चौकशीसाठी हजर राहणार संजय राऊत; ED ने वाढवून दिली वेळ

संजय राऊत यांचे वकील वेळ मागण्यासाठी ईडीच्या कार्यालयात गेले होते. कार्यालयातून बाहेर आल्यावर त्यांनी याबाबतची माहिती दिली

    मुंबई 28 जून : संजय राऊत यांना ईडीने सोमवारी समन्स (Sanjay Raut summoned by ED) बजावलं होतं. 28 जूनला म्हणजे आज चौकशीसाठी हजर राहाण्याचे आदेश ईडीने दिले होते. पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावले आहे. यापूर्वी ईडीने त्यांच्या काही मालमत्ता जप्त केल्या होत्या. मात्र, आज अलिबागमधील आपल्या आयोजित सभेमुळे संजय राऊत या चौकशीला हजर राहू शकले नाहीत. Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचं हॉटेलच्या गेटवर येऊन ओपन चॅलेंज, म्हणाले... संजय राऊत यांचे वकील वेळ मागण्यासाठी ईडीच्या कार्यालयात गेले होते. कार्यालयातून बाहेर आल्यावर त्यांनी याबाबतची माहिती दिली. संजय राऊत यांचे वकील विकास यांनी म्हटलं की ईडीने काल संजय राऊत यांना समन्स बजावलं होतं. मात्र, ते संजय राऊत यांना खूप उशिराने मिळालं. ईडीने काही कागदपत्रही मागवले होते. मात्र, इतक्या कमी वेळात ही कागदपत्र जमा करणं कठीण होतं. त्यामुळे आम्ही ईडीकडे वेळ मागितला. यासाठी ईडीने वेळ वाढवून दिला असल्याचंही त्यांनी सांगितलं. समोर आलेल्या माहितीनुसार आता ईडीने संजय राऊत यांना 1 जुलैला चौकशीसाठी बोलावलं आहे दरम्यान काल माध्यमांसोबत संवाद साधतानाचा उद्या आपल्याला ईडीच्या चौकशीसाठी हजर राहाता येणार नसल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं होतं. 'मंगळवारी माझी अलिबागला सभा आहे आणि इतरही अनेक ठिकाणी सभांचं आयोजन केलं आहे. त्यामुळे मंगळवारी मी त्या सभेला जाणार आहे आणि ईडीकडे वेळ मागणार आहे', असं संजय राऊत यांनी सांगितलं होतं. सोबतच मंगळवारी ईडीच्या कार्यालयात गेलो नाही, तरी चौकशीसाठी नक्की हजर राहील. कारण मी पळ काढणारा नाही. कायदेशीर प्रक्रियाला सामोरं जाईल, असंही राऊत म्हणाले होते. BREAKING : तब्बल 7 दिवसांनंतर एकनाथ शिंदे आले हॉटेलच्या बाहेर, पहिला VIDEO त्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी ईडीने याआधी संजय राऊत यांचा अलिबागमधील प्लॉट आणि दादरमधील फ्लॅट जप्त केला होता. यापूर्वी, या प्रकरणात आतापर्यंत 11.15 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यातील 9 कोटींची मालमत्ता प्रवीण राऊत यांची आहे, तर 2 कोटींची मालमत्ता संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या मालकीची आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: ED, Sanjay raut

    पुढील बातम्या