गुवाहाटीमध्ये सर्व आमदार स्वता:च्या इच्छेनं आले आहे. कुणावरही जबरदस्ती केली नाही. आमच्याकडे ५० आमदार आहे. आमचे कोणतेही आमदार कुणाच्या संपर्कात नाही, जे कुणी संपर्कात असतील, त्यांची नावं सांगा, असं आव्हानच शिंदेंनी दिलं. दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अभुतपूर्व असा गोंधळ निर्माण झाला आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी तब्बल ३८ आमदार आणि अपक्षांना घेऊन बंड पुकारले आहे. मागील सात दिवसांपासून सर्व आमदार हे गुवाहाटीमध्ये मुक्कामी आहे. रोज महाविकास आघाडी सरकार पाडण्याच्या चर्चा आणि शक्यतांना ऊत आला आहे. आता नवे सरकार येण्यासाठी अमावस्या आड आल्याचे समोर आले आहे. अमावस्या संपल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे अविश्वासाबद्दल पत्र जाऊ शकतं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्या सकाळी 08:41 पर्यंत अमावस्या आहे तोपर्यंत वेट अँड वॉचची भूमिका घेण्यात आली आहे. एकनाथ शिंदे गटाला शिवसेनेचा गट म्हणून पुढे येण्यास अनेक अडचणी आहे. त्यामुळे उद्या गुरुवारी प्रहार संघटनेकडून बच्चू कडू राज्यपालांना अविश्वास प्रस्तावाबाबत पत्र देऊ शकतात किंवा एकनाथ शिंदे गटाकडून पत्र दिलं जाऊ शकतं, अशी माहिती सूत्रांनी दिली.कोर्टाच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार अशा बातम्या येत असतानाच शिंदेंचा पहिला VIDEO गुवाहाटीतूनच समोर आला आहे. काय म्हणतायत पाहा.. #MaharashtraPoliticalCrisis #EknathShinde pic.twitter.com/IKaiVrqM07
— News18Lokmat (@News18lokmat) June 28, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.