मुंबई 12 जुलै : राज्यातील सत्तांतरानंतर संजय राऊत रोज ट्विटच्या माध्यमातून किंवा माध्यमांसमोर येत बंडखोर आमदार आणि भाजपला टोला लगावताना दिसतात. आता त्यांनी पुन्हा एक नवीन ट्विट केलं आहे (Sanjay Rayt Tweet) . फोटोमध्ये संजय राऊत खुर्चीवर बसलेले आहेत तर त्यांच्या शेजारीच बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा फोटो आहे. या फोटोला राऊतांनी कॅप्शनही दिलं आहे. यातून त्यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. jayant patil vs anil babar : मंत्री -संत्री व्हा पण सगळ्यांचा सातबारा माझ्याकडे, करेक्ट कार्यक्रम करणार : जयंत पाटील कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, ‘अब नही कोई बात खतरे की, अब सभी को सभी से खतरा हैं..आपल्या या ट्विटमध्ये राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस या दोघांनाही टॅग केलं आहे. यावरुनच हा या दोघांना आणि बंडखोर आमदारांनाही टोला आहे, हे स्पष्टपणे समजतं. यासोबतच राऊतांनी यात उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री कार्यालय आणि प्रियांका गांधी यांनाही टॅग केलं आहे.
अब नही कोई बात खतरे
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 12, 2022
की,
अब सभी को सभी से खतरा हैं..
जौन एलिया.@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mieknathshinde@OfficeofUT@priyankagandhi pic.twitter.com/MNVhwvL4Cj
दरम्यान सोमवारी दुपारी मातोश्रीवर झालेल्या बैठकीनंतर संजय राऊत बाहेर आले आणि माध्यमांशी काहीही न बोलता निघून गेले. त्यामुळे या बैठकीत नेमकं काय घडलं याबाबत चर्चा सुरू झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) यांच्या बैठकीमध्ये खासदार आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याचे पाहण्यास मिळालं. सर्व खासदारांनी (shivsena mp) आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे राऊत हे बैठकीनंतर कुणाशीही न बोलता बाहेर पडले होते. ‘आंबेडकरांची घटना उद्ध्वस्त झाली हे मानायला…’; ‘सर्वोच्च सुनावणी’ लांबणीवर पडताच राऊत पुन्हा गरजले NDA च्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देऊन १८ जुलै रोजी राष्ट्रपती निवडणुकीत त्यांना मतदान करण्याची भूमिका सर्व खासदारांनी मांडली. मात्र शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी सर्व खासदारांच्या विरोधात भूमिका मांडली. आपण आताही महाविकास आघाडीत आहोत. त्यामुळे विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देऊन त्यांना मतदान करण्याची भूमिका संजय राऊत यांनी मांडली.