...सगळे गारद ! संजय राऊतांनी शरद पवारांच्या मुलाखतीचा प्रोमो केला प्रसिद्ध, पाहा हा VIDEO

...सगळे गारद ! संजय राऊतांनी शरद पवारांच्या मुलाखतीचा प्रोमो केला प्रसिद्ध, पाहा हा VIDEO

पहिल्या भागात कोरोनाचा सुरू असलेला प्रादुर्भाव ते राम मंदिर पर्यंतच्या प्रश्नांवर शरद पवार यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे

  • Share this:

मुंबई, 08 जुलै : महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येऊन सरकार स्थापन केले. या महाविकास आघाडीचे शिल्पकार आहे राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार. त्यामुळे पहिल्यांदाच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची विशेष अशी ऐतिहासिक मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीची प्रोमो राऊत यांनी प्रसिद्ध केला आहे.

एक शरद सगळे गारद...! अशी टँग लाईन घेऊन शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीच्या पहिल्या भागाचा प्रोमो आज प्रसिद्ध करण्यात आला आहे.

पहिल्या भागात कोरोनाचा सुरू असलेला प्रादुर्भाव ते राम मंदिर पर्यंतच्या प्रश्नांवर शरद पवार यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे. येत्या शनिवारी या मुलाखतीचा पहिला भाग शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्र आणि डिजीटल माध्यमांवर प्रसिद्ध होणार आहे. 11, 12 आणि 13 जुलै रोजी या मुलाखतीचे भाग प्रसिद्ध होणार आहे.

राजगृह तोडफोड प्रकरणी प्रकाश आंबेडकरांची पहिली प्रतिक्रिया, जनतेला केली विनंती

संजय राऊत यांनी आत्तापर्यंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घेतलेल्या मुलाखती चांगल्याच गाजल्या आहेत. सामनामधून या मुलाखती आल्यानंतर अनेकदा देशभर वादळं निर्माण झाली होती. राऊतांच्या बेधडक प्रश्नांना बाळासाहेबांनी दिलेली बेधडक उत्तरं चांगलीच गाजली होती. आता संजय राऊतांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली आहे.

या मुलाखतीत राऊतांनी शरद पवारांना अनेक गुगली प्रश्न विचारले. मात्र, त्या सर्व प्रश्नांवर पवारांनी षटकार ठोकत खास आपल्या शैलीत उत्तरं दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चीन पासून ते महाराष्ट्रातल्या घटनांपर्यंत अनेक विषयांवर पवारांना प्रश्न विचारले ही प्रश्नोत्तरे सामना स्टाईल झाली.

Published by: sachin Salve
First published: July 8, 2020, 9:26 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading