Home /News /mumbai /

'राजगृह'वर तोडफोड प्रकरणावर प्रकाश आंबेडकर यांची पहिली प्रतिक्रिया, जनतेला केली विनंती

'राजगृह'वर तोडफोड प्रकरणावर प्रकाश आंबेडकर यांची पहिली प्रतिक्रिया, जनतेला केली विनंती

'राजगृहावर दोन व्यक्ती आले होते, ही गोष्ट खरी आहे. या दोन व्यक्तींनी नासधूस केली आणि सीसीटीव्ही कॅमेरे तोडण्याचा प्रयत्नही केला'

    मुंबई, 08 जुलै :  मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेलं 'राजगृह' इथे दोन अज्ञात व्यक्तींनी मंगळवारी रात्री हल्ला करून तोडफोड केली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून चौकशी सुरू आहे. बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जनतेनं शांत राहावे, असं आवाहन तमाम जनतेला केले आहे. तर  राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी दोषींविरोधात कठोर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. मंगळवारी रात्री दोन अज्ञात व्यक्तींनी मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर जाऊन तोडफोड केली.  घराच्या काचांवर दगडफेक करण्यात आली तर कुंड्यांचं मोठं नुकसान करण्यात आलं. एवढंच नाहीतर सीसीटीव्ही कॅमेऱ्याही तोडण्याचा प्रयत्न केला.  या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. 'राजगृहावर दोन व्यक्ती आले होते, ही गोष्ट खरी आहे. या दोन व्यक्तींनी नासधूस केली आणि सीसीटीव्ही कॅमेरे तोडण्याचा प्रयत्नही केला. राजगृहावर सर्व पोलीस आणि अधिकारी पोहोचले असून चौकशी सुरू आहे, पोलिसांनी अत्यंत चोख काम केले आहे, अशी माहिती आंबेडकर यांनी दिली. तसंच, 'या प्रकरणी सर्व जनतेनं शांतता राखली पाहिजे. राजगृहाच्या आजूबाजूला गर्दी करू नका', अशी विनंतीही आंबेडकर यांनी केली. दरम्यान, दादर येथील 'राजगृह' या डॉ.आंबेडकरांच्या निवासस्थानावर काही अज्ञात व्यक्तींनी आज जो हल्ला केला तो निषेधार्थ आहे. याबाबत पोलिसांचा तत्परतेने तपास सुरू असून दोषींविरुद्ध कठोर कार्यवाही केली जाईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. भाजप नेत्याने दिली जिवे मारण्याची धमकी; छळाने शेतकऱ्यांने उचललं टोकाचं पाऊल तर, 'महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान 'राजगृह' ही आमची अस्मिता आहे, माथेफिरूंनी केलेली तोडफोड हा आमच्या अस्मितेवर केलेला भ्याड हल्ला आहे. मी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो.' या प्रकरणी माथेफिरूवर कठोर कारवाई करण्याची मागणी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. आम्हा आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. राजगृहावर झालेल्या भ्याड हल्ल्याची सखोल चौकशी करण्यात यावी आणि या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई तातडीनं करण्याची मागणी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. हवेतूनही पसरू शकतो कोरोना; कसा कराल स्वत:चा बचाव राजगृह हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी इथे दररोज भेट देण्यासाठी येत असतात. त्यामुळे या निवासस्थानाला विशेष महत्त्व आहे. ‘राजगृह’ तोडफोडीची घटना निषेधार्ह, विकृत मानसिकतेतून -अजित पवार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील ऐतिहासिक महत्वाच्या ‘राजगृह’ निवासस्थानी झालेली तोडफोडीची घटना अत्यंत निषेधार्ह असून हे समाजविघातक विकृत मानसिकतेचं दुष्कृत्य आहे. राज्य शासनाने घटनेची गंभीर दखल घेतली असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून तपासकार्य सुरू केलं आहे. आरोपींना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी असे दुष्कृत्य करणाऱ्या समाजविघातक शक्तींच्या कुहेतूला बळी पडू नये, शांतता, संयम पाळावा, एकजूट कायम ठेवावी, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. महामानव डॉ. बाबासाहेबांचे कार्य आणि विचार समाजमनात खोलवर रुजले आहेत, आपल्या सर्वांची त्यांच्यावर भक्कम श्रद्धा आहे, त्या श्रद्धेला कुणीही धक्का लावू शकत नाही, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Mumbai, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मुंबई

    पुढील बातम्या