मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ, दलित संघटनेची जात पडताळणी समितीकडे तक्रार

समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ, दलित संघटनेची जात पडताळणी समितीकडे तक्रार

'मागसवर्गीय असल्याचं सांगून जागा बळकावल्या आहे, त्यांच्या जागी एखाद्या हुशार गरीब विद्यार्थ्याला संधी मिळाली असती'

मुंबई, 04 नोव्हेंबर : मुंबई ड्रग्स प्रकरणात आर्यन खानची जामिनावर सुटका झाली आहे. पण, राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे मुंबई विभागीय अधिकारी समीर वानखेडे  (Sameer Wankhede) यांच्यावर जातीचा दाखला खोटा असल्याचा आरोप केला आहे. आता या प्रकरणी भीम आर्मी भारत एकता मिशनने (Bhim Army India ekata Mission) जात पडताळणी समितीकडे ( caste verification committee) तक्रार केली आहे. त्यामुळे समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह आहे.

समीर वानखेडे यांच्यावर जातीचा दाखल खोटा असल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे त्यांनी रिपाइंचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर आठवलेंनी वानखेडेंची जोरदार पाठराखण केली होती. पण, दुसरीकडे आता दलित संघटना समीर वानखेडेंच्याविरोधात आक्रमक झाली आहे.

VIDEO : आईच्या आठवणीत मुख्यमंत्रीही झाले भावुक; भरकार्यक्रमात पाणावले डोळे

समीर वानखेडे हे भ्रष्ट अधिकारी आहे. त्यांच्याविरोधात जात पडताळणी विभागाकडे तक्रार केली आहे. वानखेडे हे मागसवर्गीय नाही. त्यांनी बनावट कागदपत्र दाखवून जागा बळकावली आहे, असा आरोप भीम आर्मी भारत एकता मिशनचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे  यांनी केला आहे.

नुसते समीर वानखेडेच नाहीतर देशभरात असे अनेक बनावट अधिकारी आहे, ज्यांना मागसवर्गीय असल्याचं सांगून जागा बळकावल्या आहे, त्यांच्या जागी एखाद्या हुशार गरीब विद्यार्थ्याला संधी मिळाली असती, अशा बनावट अधिकाऱ्यांविरोधात आम्ही देशभरात आंदोलन करणार आहोत, असंही अशोक कांबळे यांनी सांगितलं.

फटाके फोडताना काळजी घ्या! 13 वर्षीय विशालचा डोळा थोडक्यात वाचला, पडले 6 टाके

समीर वानखेडे यांच्याविरोधात जिल्हास्तरीय जात पडताळणी समितीकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे समितीने त्यांची योग्य ती तपासणी करून कडक कारवाई करावी, अशी मागणीही कांबळे यांनी केली.

विशेष म्हणजे, समीर वानखेडे यांच्यावर जातीच्या दाखल्याचा आरोप झाल्यानंतर त्यांनी दिल्लीतील अनुसूचित जाती आयोगाच्या कार्यालयात हजर राहून आपल्याकडे असलेली सर्व कागदपत्र दाखवली होती. आयोगाकडून त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे.

दरम्यान, समीर वानखेडे यांनी धर्मातर केले नसल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसत असल्याचं राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी म्हटलं आहे. समीर वानखेडे यांनी अरुण हलदर यांची भेट घेत आपले कागदपत्रे त्यांच्याकडे सोपवली त्यानंतर अरुण हलदर यांनी ही प्रतिक्रिया दिली होती.

काय आहे मलिक यांचा आरोप?

समीर वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारावर नोकरी मिळवली आहे. एका होतकरू तरुणाची नोकरी समीर वानखेडेंनी हिरावली आहे. धर्मावरुन राजकारण करण्याचा माझा हेतू नाही. समीर वानखेडे याने बनावट जात प्रमणपत्र बनवून नोकरी मिळवली आहे. वानखेडेंच्या पहिल्या पत्नीच्या कुटुंबियांना धमकावण्यात येत आहे, असा गंभीर आरोपही नवाब मलिकांनी केला होता.

First published: