मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /फटाके फोडताना काळजी घ्या! 13 वर्षीय विशालचा डोळा थोडक्यात वाचला, पडले 6 टाके

फटाके फोडताना काळजी घ्या! 13 वर्षीय विशालचा डोळा थोडक्यात वाचला, पडले 6 टाके

आज सकाळी विशाल सुद्धा आपल्या मित्रांसोबत फटाके फोडत होता त्यावेळी एक फटाका फुटला आणि...

आज सकाळी विशाल सुद्धा आपल्या मित्रांसोबत फटाके फोडत होता त्यावेळी एक फटाका फुटला आणि...

आज सकाळी विशाल सुद्धा आपल्या मित्रांसोबत फटाके फोडत होता त्यावेळी एक फटाका फुटला आणि...

राहुल खंदारे, प्रतिनिधी

बुलडाणा, 04 नोव्हेंबर : सर्वत्र दिवाळीची (diwali) धामधूम सुरू आहे. आज लक्ष्मीपूजनानंतर (diwali laxmi pujan) फटाके फोडण्यास सुरूवात होईल, पण फटाके (firecrackers)  फोडत असताना आपल्या लहान मुलांची काळजी घ्या. कारण,  फटाके फोडत असताना फटाक्यांमुळे 13 वर्षीय मुलाच्या डोळ्याखालील दुखापत झाल्याची घटना बुलडाण्यात घडली आहे. यामध्ये त्याचा डोळा थोडक्यात बचावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना शेगाव तालुक्यातील जलंब इथे घडली. विशाल गजानन गाडे असं जखमी झालेल्या या मुलाचे नाव आहे. सध्या जखमी विशालवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण, त्याचा डोळा अगदी थोडक्यात वाचला आहे.

दिवाळी नवीन कपडे त्याच बरोबर लहानमुलांसाठी फटाके देखील खरेदी करून घरामध्ये ठेवण्यात आले आहेत. आज सकाळपासून फटाक्यांचे आवाज कानी ऐकू येत आहेत. दिवाळीनिमित्त आदल्या दिवसापासूनच फटाके फोडण्यास सुरुवात केली. आज सकाळी विशाल सुद्धा आपल्या मित्रांसोबत फटाके फोडत होता.

Best 5G Smartphones : 20 हजारांहून कमी किंमतीत घेता येतील हे फोन, पाहा फीचर्स

फटाके फोडत असताना अचानक एक चूक झाली. एक फटाका फुटला आणि त्याच्या डाव्या डोळ्याखाली दुखापत झाली. दुखापत झाल्यामुळे एकच गोंधळ उडाला. त्याच्या मित्रांनी तातडीने त्याला घरी नेलं. तिथून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. यामध्ये त्याच्या डोळ्याखाली सहा टाके पडले आहे.

नोकरी सोडून उद्योजक व्हायचंय? मग 'या' 7 गोष्टी तुम्हाला माहीत असायला हव्यात

दिवाळी सणात फटाके फोडण्याचा उत्साहाचा मोह  लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवरता येत नाही. मात्र मुलांच्या हातात फटाके देताना काळजी घेतली पाहिजे. फटाके फोडत असताना लहान मुलांसोबत घरातली मोठ्या व्यक्तीने थांबले पाहिजे, जेणेकरून लहानांना कुठली इजा होणार नाही.

First published: