Home /News /national /

VIDEO : आईच्या आठवणीत मुख्यमंत्रीही झाले भावुक; भरकार्यक्रमात पाणावले डोळे

VIDEO : आईच्या आठवणीत मुख्यमंत्रीही झाले भावुक; भरकार्यक्रमात पाणावले डोळे

ते गाणं सुरू असताना मुख्यमंत्र्यांनाही आपले अश्रू अनावर झाले.

    मध्य प्रदेश, 4 नोव्हेंबर : आईची तुलना कशाचीही करता येत नाही. अगदी सर्वसामान्य व्यक्तीपासून ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याही डोळ्यात आईच्या ममत्वामुळे अलगद डोळे पाणावतात. त्यात आईची आठवण करून देणारं एखादं गाणं जरी ऐकलं तरी आपोआप तिच्या आठवणींनी डोळे पाणावतात. मध्य प्रदेशचे (madhya pradesh CM) मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांचा एक व्हिडीओ (Video Viral On Social Media) सध्या समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगी आईसंबंधित गाणं गाताना दिसत आहे. हे गाणं ऐकताना मुख्यमंत्र्यांचेही डोळे पाणावल्याचं दिसत आहे. ट्विटवर एक पत्रकाराने हा व्हिडीओ शेअर केला आहे. (VIDEO CM also became emotional in mothers memory started crying at the event) अनेकदा आई आपल्यात असते तेव्हा तिचं महत्त्व कळत नाही. मात्र जेव्हा ती दिसेनाशी होते तेव्हा मात्र कायम तिची कमतरता आपल्याला भासत राहते.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Madhya pradesh, Shivraj singh chauhan, Video viral

    पुढील बातम्या