मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मराठा आरक्षणाप्रश्नी संभाजीराजे घेणार आज मुख्यमंत्र्यांची भेट, फडणवीसांसोबतही बैठक

मराठा आरक्षणाप्रश्नी संभाजीराजे घेणार आज मुख्यमंत्र्यांची भेट, फडणवीसांसोबतही बैठक

मराठा आरक्षणा (Maratha Reservation)च्या मुद्द्यावर आज दुपारी 12 च्या सुमारास राज्याचे विरोधी पक्षनेत्यांसोबत बैठक होईल आणि त्यानंतर दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्र्यांची भेट होईल.

मराठा आरक्षणा (Maratha Reservation)च्या मुद्द्यावर आज दुपारी 12 च्या सुमारास राज्याचे विरोधी पक्षनेत्यांसोबत बैठक होईल आणि त्यानंतर दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्र्यांची भेट होईल.

मराठा आरक्षणा (Maratha Reservation)च्या मुद्द्यावर आज दुपारी 12 च्या सुमारास राज्याचे विरोधी पक्षनेत्यांसोबत बैठक होईल आणि त्यानंतर दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्र्यांची भेट होईल.

मुंबई, 28 मे: खासदार संभाजी राजे छत्रपती आज सुद्धा राजकीय नेत्यांना भेटून मराठा आरक्षणा (Maratha Reservation) ला समर्थन मिळवण्याचा प्रयत्न करणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज संभाजीराजे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतील. तसंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही ते भेट घेणार आहेत.  गुरुवारी संभाजी राजे छत्रपती (Chhatrapati Smabhaji Raje) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती.

मराठा समाजाच्या मनात असलेला असंतोष व्यक्त करणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी चार वाजता एकूणच महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून दौरा केल्यानंतर आणि सर्व राजकीय पक्षांच्या अध्यक्षांना भेटल्यानंतर ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज दुपारी 12 च्या सुमारास राज्याचे विरोधी पक्षनेत्यांसोबत बैठक होईल आणि त्यानंतर दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट होईल.

मराठा समाज सध्या आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी खासदार संभाजीराजे (MP Chhatrapati Sambhaji Raje) हे सध्या महाराष्ट्राचा दौरा करत सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेत आहेत. गुरुवारी सकाळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांची भेट घेतल्यावर त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची (MNS Chief Raj Thackeray) भेट घेतली.

राज ठाकरेंचे मत काय?

खासदार संभाजीराजे यांनी पुढे म्हटलं, मराठा समाजाला न्याय कसा द्यावा ही जबाबदारी सर्व पक्षाच्या प्रमुखांची आहे. यासाठीच माझे प्रयत्न सुरू आहेत. समाजाला न्याय मिळावा यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे. राज ठाकरेंची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. राज ठाकरे हे खऱ्या अर्थाने जात-पात मानत नाही. पण मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मताचे ते आहेत.

छत्रपती शाहू महाराज आणि राजसाहेबांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे ह्यांचे घनिष्ठ स्नेहसंबंध होते. आजही छत्रपती घराणं आणि ठाकरे घराण्याचं नातं तितकंच सलोख्याचं आहे.

राजसाहेबांमध्ये आणि माझ्यामध्ये एक समान दुवा आहे तो गडकिल्ले संवर्धनासाठी काम करण्याचा. किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आणि जतनासाठी काय करता येईल यावरही आमच्या दोघांत चर्चा झाली असंही संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

First published:
top videos

    Tags: Devendra Fadnavis, Maratha reservation, Sambhajiraje chhatrapati, Uddhav thackeray