राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहाव्या जागेवर अपक्ष निवडणूक लढवण्याचं संभाजीराजे यांनी जाहीर केलं. मात्र, शिवसेनेकडे अधिक मते असल्याने त्यांनी ही निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं. त्यानंतर संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असता त्यांना शिवसेनेकडून निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यात आली. मात्र, शिवसेनेकडून निवडणूक लढण्यास संभाजीराजे यांनी नकाल दिला. अखेर शिवसेनेने कोल्हापुरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना सहाव्या जागेसाठी उमेदवारी दिली. त्यानंतर संभाजीराजे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली होती. संभाजीराजे यांनी पुढे म्हटलं होतं, ज्या आमदारांनी फॉर्मवर सह्या केल्या त्या सर्वांचे आभार मानतो. त्या आमदारांच्या आयुष्यभर मी पाठीशी राहील. केव्हाही त्यांनी हाक द्यावी संभाजी छत्रपती त्यांच्या सेवेत असणार. शिवसेनेने मला ऑफर दिली आणि पक्षात प्रवेश करण्याची खासदारकी मिळवा. मी घेऊ शकलो असतो पण मी जाहीर केलं होतं की, मी जाणार नाही. कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवायची. पण घोडे बाजार होणार... घोडेबाजारसाठी माझी उमेदवारी नाहीये. निष्कलंक माझं व्यक्तिमत्व आहे. निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये म्हणून मी उमेदवारी अर्ज भरणार नाही.समर्थकांनी माझ्या प्रेमापोटी जे फ्लेक्स लावले, त्यांच्या प्रेमाचा मी आदरच करतो. मात्र कोणत्याही पक्षाला खुन्नस म्हणून त्यांच्या कार्यालयासमोर अशी काही कृती करणे, हे माझ्या तत्वात बसत नाही. राजकारणात येणार असलो तरी 'स्वराज्य'ला तत्वांची बैठक असेल.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 12, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.