Home /News /mumbai /

Sanjay Raut: "... तर देवेंद्र फडणवीस सुद्धा शिवसेनेला मतदान करतील" : संजय राऊत

Sanjay Raut: "... तर देवेंद्र फडणवीस सुद्धा शिवसेनेला मतदान करतील" : संजय राऊत

"... तर देवेंद्र फडणवीस सुद्धा शिवसेनेला मतदान करतील", राज्यसभा निवडणुकीनंतर संजय राऊतांचं मोठं विधान

"... तर देवेंद्र फडणवीस सुद्धा शिवसेनेला मतदान करतील", राज्यसभा निवडणुकीनंतर संजय राऊतांचं मोठं विधान

Sanjay Raut on Devendra Fadnavis: शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजप हे शिवसेनेला मतदान करतील असं विधान केलं आहे. नेमकं असं का म्हणाले संजय राऊत?

    मुंबई, 12 जून : शिवसेनेचे नेते संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांनी राज्यसभा निवडणुकीनंतर अपक्ष आमदारांवर (Independent MLA) गंभीर आरोप केला. आम्हाला मत देण्याचं म्हणणाऱ्या अपक्ष आमदारांनी भाजप उमेदवाराला मतदान केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. इतकेच नाही तर संजय राऊत यांनी थेट अपक्ष आमदारांची नावेच जाहीर केली. त्यानंतर आता संजय राऊत यांनी एक मोठं विधान केलं आहे. ...तर फडणवीस सुद्धा शिवसेनेला मतदान करतील संजय राऊत यांनी म्हटलं, अपक्ष आमदारांच्या बाबत आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या. यामध्ये कोणत्याही आमदाराचा अवमान करण्याचा प्रश्न नाही. आम्ही काय बोलतोय हे त्यांनाही माहिती आहे आणि भाजपलाही माहिती आहे. आमच्या हातात जर दोन दिवस ईडी दिली तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सुद्धा शिवसेनेला मतदान करतील. वाचा : निवडणुकीत कुठल्या आमदारांची मते मिळाली नाही? संजय राऊतांनी थेट आमदारांची नावेच केली जाहीर एक पराजय म्हणजे अणुबॉम्ब कोसळला असं नाही संजय राऊत पुढे म्हणाले, आम्हाला सर्वकाही माहिती आहे. विषय संपलेला आहे. एक विजय झाला आणि एक पराजय झाला म्हणजे अणुबॉम्ब कोसळला असं होत नाही किंवा महाप्रलय आला आणि सर्व वाहून गेलं असं होत नाही. अनेक राज्यांमध्ये असे निकाल लागले आहेत. राज्यस्थानात काँग्रेस जिंकली आहे. हरियाणात रडीचा डाव खेळून निवडणूक आयोग आणि भाजपने अजय माकन यांचा पराभव केला आहे. वाचा : अपक्ष आमदारांनी खरंच भाजपला मतदान केलं? संजय राऊतांच्या आरोपांवर देवेंद्र भुयार यांनी म्हटलं... भाजपवर गंभीर आरोप महाराष्ट्रातही निवडणूक आयोगात हाताशी धरुन रात्रीच्या अंधारात इथले नेते काय करत होते? ही सर्व माहिती आहे आमच्याकडे... गृहखात्याला कसे फोन जात होते, गृहखात्यातून निवडणूक आयोगाला कसे फोन जात होते. कुणाचं मत बाद करायचं यावर कशी चर्चा होती. यंत्रणा आमच्याकडेही आहे फक्त ईडी नाहीये. जर ईडी आमच्याकडे 48 दिली तर भाजप सुद्धा आम्हाला मतदान करेन असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. अपक्षांवरील आरोप शिवसेनेला पडणार महागात? संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांमुळे अपक्ष आमदार नाराज झाले आहेत. देवेंद्र भुयार यांनी म्हटलं, शिवसेनेचं नियोजन चुकलेलं आहे. मला एक सुद्धा फोन शिवसेनेकडून आला नाही तरी मी त्यांना मतदान केलं आहे. आम्ही शरद पवारांची भेट घेणार आहोत. प्रामाणिकपणे मतदान करुन सुद्धा अशा प्रकारे आमच्याबाबत विधान केले जात असतील तर हे चुकीचं आहे. आम्हालाही लोकांनी निवडून दिलं आहे आणि अशावेळी आमच्याविषयी गैरसमज करणं चुकीचं आहे. आता आम्हाला सर्व अपक्ष आमदारांना एकत्र येऊन विचार करावा लागेल. हा केवळ माझ्या एकट्यावर नाही तर सर्व अपक्षांवर दाखवलेला अविश्वास आहे असंही आमदार देवेंद्र भुयार यांनी म्हटलं आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Maharashtra News, Sanjay raut, Shiv sena

    पुढील बातम्या