मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /'आता जगाला गुडबाय म्हणण्याची वेळ...', सचिन वाझेंचं धक्कादायक WhatsApp Status

'आता जगाला गुडबाय म्हणण्याची वेळ...', सचिन वाझेंचं धक्कादायक WhatsApp Status

Mansukh Hiren Case: शुक्रवारी सचिन वाझेंची बदली देखील करण्यात आली आहे. त्यानंतर आज वाझेंनी व्हॉट्सअॅपवर ठेवलेल्या स्टेटसमुळे हे प्रकरण काय वळण घेतं ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Mansukh Hiren Case: शुक्रवारी सचिन वाझेंची बदली देखील करण्यात आली आहे. त्यानंतर आज वाझेंनी व्हॉट्सअॅपवर ठेवलेल्या स्टेटसमुळे हे प्रकरण काय वळण घेतं ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Mansukh Hiren Case: शुक्रवारी सचिन वाझेंची बदली देखील करण्यात आली आहे. त्यानंतर आज वाझेंनी व्हॉट्सअॅपवर ठेवलेल्या स्टेटसमुळे हे प्रकरण काय वळण घेतं ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

ठाणे, 13 मार्च: गेल्या काही दिवसांपासून सचिन वाझे (Sachin Vaze) हे नाव महाराष्ट्रात गाजत आहेत. ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन (Mansukh Hiren) याच्या मृत्यूप्रकरणात वाझेंचं नाव समोर आलं आहे. वाझे यांनी कट रचून हिरेन यांची हत्या केल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान वाझे यांनी व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवत धक्कादायक आरोप केला आहे.

सचिन वाझे यांनी WhasApp च्या माध्यमातून धक्कादायक संदेश दिला आहे. त्यांनी  व्हाॅट्सअॅपला स्टेट ला ठेवत असं म्हटलं आहे की, टआता जगाला गुडबाय म्हणण्याची वेळ आली आहे. माझेच अधिकारी मला फसवत आहेत. खोट्या केसमध्ये मला यात अडकवलं जात आहे. 3 मार्च 2014 ला सीआयडी मधील अधिकाऱ्यांनी मला खोट्या केसमध्ये अटक केली होती. आता तोच इतिहास पुन्हा रिपीट होत आहे.'

यामध्ये त्यांनी आता जगण्याची शक्ती शिल्लक नसल्याचं म्हटलं आहे. वाझेंनी या स्टेटसमध्ये पुढे असं म्हटलं आहे की, 'आता पोलीस सेवाही नाही आणि जगण्याची सहनशक्तीही नाही. आता वेळ आली आहे जगाचा निरोप घेण्याची. जग जवळ येत चाललं आहे.'

(हे वाचा-रेखा जरे हत्याकांड प्रकरणात मोठी घडामोड! मुख्य सूत्रधार बाळ बोठेला अटक)

वाझेंना अटकपूर्व जामीन अद्याप नाही

नसुख मिश्रीलाल हिरेन यांच्या हत्या प्रकरणात कधीही अटक होऊ शकते हे लक्षात आल्यानंतर वादग्रस्त अधिकारी सचिन वाझे यांनी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या जामीन अर्जावर शुक्रवारी 12 मार्च रोजी सुनावणी झाली. सचिन वाझे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळावा अशी मागणी करणारा युक्तीवाद  न्यायालयात करण्यात आला. त्यानुसार या प्रकरणातील महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाचे तपास अधिकाऱ्यांचे या अटकपूर्व जामीन अर्जावर काय म्हणणे आहे, ते पुढील सुनावणीत मांडले जावे असे आदेश माननीय न्यायालयाने दिलेत. त्यानुसार सचिन वाझे यांनी केलेल्या सचिन वाझेंच्या अटकपूर्व जामिनाच्या अर्जावर 19 मार्च रोजी होणार आहे.

एकाच दिवसात दोन वेळा बदली

शुक्रवारी सचिन वाझे यांची मुंबई पोलीस आयुक्तालयातील नागरी सुविधा केंद्र विभागात बदली करण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते. (Sachin Vaze transfer twice in the same day). मात्र पुन्हा नव्या माहितीनुसार तिथूनही सचिन वाझे यांनी बदली करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तालयाला लागून असलेल्या विशेष शाखेत त्यांची बदली करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. याचा अर्थ एकाच दिवसात वाझे यांची दोनदा बदली करण्यात आली. SB 1 म्हणजेच विशेष शाखेत त्यांची कागदोपत्री बदली करण्यात आली आहे. मात्र असे असले तरी त्यांना पोलीस आयुक्तालयातील नागरी सुविधा केंद्रात सेवेत राहतील. यावरुन त्यांना कोणते अधिकारी पाठिशी घालत आहे, या चर्चेला उधाण आलं होतं.

(हे वाचा-लाज आणणारी घटना, वृद्ध मृत्यूशी झुंज देत होता आणि पोलीस तमाशा बघत होते!)

सचिन वाझे हे गेल्यावर्षी तब्बल 16 वर्षांनी पोलीस दलात परतले होते. एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून त्यांची ओळख आहे. क्राईम ब्रँचच्या सीआययू युनिटचे एपीआय असणारे सचिन वाझे मुंबईत सापडलेल्या स्फोटकांचा तपास करत होते. मात्र आता हा तपास सहायक पोलीस आयुक्त नितीन अल्कनुरे यांच्याकडे सोपवण्यात आला. शुक्रवारी वाझेंची बदली देखील करण्यात आली आहे. त्यानंतर आज वाझेंनी व्हॉट्सअॅपवर केलेल्या आरोपामुळे हे प्रकरण काय वळण घेतं ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

First published:
top videos

    Tags: Crime, Crime news, Hiren mansukh, Murder news, Sachin vaze, Thane police, Whatsapp