• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • सचिन वाझेनं अनिल देशमुखांच्या सचिवाकडे दिल्या होत्या पैशांनी भरलेल्या 16 बॅगा, आरोपपत्रात खुलासा

सचिन वाझेनं अनिल देशमुखांच्या सचिवाकडे दिल्या होत्या पैशांनी भरलेल्या 16 बॅगा, आरोपपत्रात खुलासा

 सचिन वाझे याने अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरून ऑर्केस्ट्रा बार मालकाकडून जवळपास एक कोटी 64 लाख रुपये वसूल केले होते.

सचिन वाझे याने अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरून ऑर्केस्ट्रा बार मालकाकडून जवळपास एक कोटी 64 लाख रुपये वसूल केले होते.

सचिन वाझे याने अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरून ऑर्केस्ट्रा बार मालकाकडून जवळपास एक कोटी 64 लाख रुपये वसूल केले होते.

  • Share this:
मुंबई, 17 सप्टेंबर : 100 कोटी वसुली प्रकरणी राष्ट्रवादीचे (ncp) नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने (ed) नुकतीच दोन आरोपपत्रं (chargesheet ) विशेष न्यायालयात दाखल केलेली आहेत. ही दोन्ही आरोपपत्र अनिल देशमुख यांचे खाजगी आणि शासकीय पी ए संजीव पालांडे (sanjeev palande) आणि कुंदन शिंदे (kunden shinde) यांच्याविरोधात दाखल केलेली आहेत. अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना त्यांनी सचिन वाझे (sachin vaze) याला 16 पैशांनी भरलेले या बॅगा द्यायला सांगितले होते आणि हे पैसे सचिन वाझे याने कुंदन शिंदे याला दोन वेळा दिले होते, असा धक्कादायक खुलासा या आरोपपत्रातून जाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्यांदा सह्याद्री गेस्ट हाऊस बाहेर आणि दुसऱ्यांदा राजभवनाजवळ 4 कोटी 60 लाख रुपये देण्यात आले होते, असा आरोप करण्यात आला आहे. तर जानेवारी आणि फेब्रुवारी 2021 म्हणजेच याच वर्षी सचिन वाझे याने अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरून ऑर्केस्ट्रा बार मालकाकडून जवळपास एक कोटी 64 लाख रुपये वसूल केले होते. मुंबई पोलिसांच्या झोन 1 आणि झोन 7 या दोन झोनमधून हे पैसे गोळा करण्यात आले होते. म्हणजेच साऊथ मुंबई आणि मुंबई उपनगर या भागातून ते पैसे गोळा करण्यात आले होते. देशात कोविड लसीचा बूस्टर डोस?, आरोग्य मंत्रालयानं केलं स्पष्ट; म्हणाले... तर सचिन वाझे याने सीआययु म्हणजेच क्राईम इंटेलिजन्स युनिट या युनिटचा पदभार स्वीकारल्यानंतर ऑर्केस्ट्रा आणि बार ओनर्सना त्यांचे बार सुरळीत चालावे याकरता 4 कोटी 70 लाख रुपये मागितले होते आणि ते त्याने गोळा करूनही दिले होते, हे सर्व पैसे सचिन वाझे याने अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांच्यामार्फत किंवा याच्याशी संबंधित असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवले होते. रिलायबल फायनान्स कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड, व्ही ए रियल कोन प्रायव्हेट लिमिटेड, उत्सव सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड आणि शिताल लिजिंग अंड फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये गुंतवले होते. नंतर हीच रक्कम विविध बँकांतून श्री साई शिक्षण संस्था ट्रस्ट या संस्थेच्या खात्यात वळते करण्यात आले होते. केवळ 1 मेसेज आणि कायमची बंद होईल Corona Caller Tune, अशी करा सोपी प्रोसेस एवढेच नाही तर 2013 पासून या श्री साई शिक्षण संस्था ट्रस्टमध्ये अनेक बेनामी व्यवहार ईडीला आढळले आहेत. ईडीचा असा दावा आहे की, या श्री साई शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आणि देशमुख आणि त्याच्या परिवारातील सदस्य हे काळा पैसा पांढरा करत होते. या श्री साई शिक्षण संस्था ट्रस्टचे सर्व आर्थिक व्यवहार ईडी तपासत असून प्रथमदर्शनी या साई शिक्षण संस्था प्रश्न आर्थिक व्यवहारात गैरव्यवहार आढळून आल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हे सर्व ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात देखील नमूद केले आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांचे सचिन वाझे यांच्याशी थेट संबंध होते आणि अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना 100 कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते. त्यापैकी चार कोटी 18 लाख रुपये अनिल देशमुख यांनी स्वीकारले होते असा दावा इडीने त्यांच्या आरोपपत्रात केला आहे.
Published by:sachin Salve
First published: