Home /News /national /

देशात कोविड लसीच्या बूस्टर डोसबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं स्पष्टीकरण

देशात कोविड लसीच्या बूस्टर डोसबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं स्पष्टीकरण

या महामारीला रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस (Corona Vaccine) हे एकमेव मोठं शस्त्र मानलं जात आहे.

    नवी दिल्ली, 17 सप्टेंबर: देशात कोरोना व्हायरसची (Coronavirus in India) संभाव्य तिसरी लाट (Third Wave) येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण (Corona Patients) वाढताना दिसत आहे. या महामारीला रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस (Corona Vaccine) हे एकमेव मोठं शस्त्र मानलं जात आहे. देशात सध्या 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस दिली जात आहे आणि या दरम्यान अनेक देशांनी कोविड -19 विरुद्ध बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर भारतात कोरोना लसीचा बूस्टर डोस भारतात कधी दिला जाईल, असा हा प्रश्न विचारण्यात येऊ लागला. यावर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे. आरोग्य मंत्रालयानं म्हटलं की, दोन डोसच्या पूर्ण लसीकरणाला प्राधान्य आहे. मोठी बातमी: अभिनेता साहिल खान विरोधात गुन्हा दाखल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry)हे स्पष्ट केलं आहे की, देशाची प्राधान्यता कोरोना लसीचे (Corona Vaccine) दोन्ही डोस सर्व लोकांना देणं आहे आणि ते चालूच राहील. या वर्षाच्या शेवटपर्यंत प्रत्येकाचं लसीकरण पूर्ण करणं हे सरकारचं उद्दिष्ट आहे. (Covid-19 Vaccine Booster Dose) कोविड -19 वर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ब्रीफिंग दरम्यान, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे डीजी डॉ. बलराम भार्गव (ICMR DG Balram Bhargava) म्हणाले की, सरकारच्या वैज्ञानिक आणि सार्वजनिक आरोग्य सेवा चर्चेत यावेळी बूस्टर डोस हा मुख्य विषय नाही आहे. सध्या दोन डोससह पूर्णपणे लसीकरण हे मुख्य प्राधान्य आहे. मुलगा-सुनेच्या छळवणुकीतून वृद्ध दाम्पत्याची सुटका; 10 दिवसात आलिशान घर सोडण्याचे आदेश  देशभरात लसीचे 77.25 कोटी डोस केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत भारतात कोरोना लसीचे 77 कोटी 24 लाख 25 हजार 744 डोस देण्यात आले आहेत. देशभरातील 58 कोटी 26 लाख 6 हजार 905 लोकांनी एक डोस घेतला आहे. तर 18 कोटी 98 लाख 18 हजार 839 लोकांना दोन्ही डोस देण्यात आलेत. दरम्यान आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका, यूके, कॅनडा, अर्जेंटिना, ब्राझील, फ्रान्स, स्पेन, इटली, जर्मनी, सौदी अरेबिया, टर्की, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, रशिया आणि स्वित्झर्लंड या सर्व देशांमध्ये मिळून एका दिवसात जेवढं लसीकरण होतं, त्यापेक्षा जास्त लसीकरण (India corona vaccination) भारतात एका दिवसात होत आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Corona vaccination, Corona vaccine, Corona virus in india, Coronavirus

    पुढील बातम्या