Home /News /mumbai /

Sachin Vaze प्रकरणाची महत्त्वाची बातमी, मुंबई पोलीस दलातील मोठ्या अधिकाऱ्यांची होणार चौकशी?

Sachin Vaze प्रकरणाची महत्त्वाची बातमी, मुंबई पोलीस दलातील मोठ्या अधिकाऱ्यांची होणार चौकशी?

सचिन वाझे हे थेट तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्या संपर्कात होते. त्यामुळे...

मुंबई, 18 मार्च :  मुंबईमध्ये स्फोटकांनी सापडलेल्या कार प्रकरणी पोलीस दलातील  (Mumbai Police) अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना अटक झालानंतर दररोज नवनवीन खुलासे होत आहे. या प्रकरणीत आता राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने (NIA) कारवाईचा फास आणखी आवळला आहे. या प्रकरणी मुंबई पोलीस दलातील दोन मोठ्या अधिकाऱ्यांना चौकशीला बोलावण्यात येण्याची शक्यता हे. सचिन वाझे सध्या एनआयएच्या कोठडीत आहे. त्यांची चौकशी सुरू असून मुंबई क्राईम ब्रांचचे जॉईंट कमिशनर मिलिंद भारंबे (Milind Bharambe) आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांन एनआयए बोलावण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची अधिक माहिती घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीसठी बोलावण्याची शक्यता आहे.  येत्या एक-दोन दिवसांत चौकशी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. भररस्त्यात तरुणीचं अपहरण, आसपासच्या लोकांनी काय केलं याचीच चर्चा; Video Viral सचिन वाझे हे गुन्हे अन्वेषण शाखेच्या गुन्हे गुप्त वार्ता (सीआययू)मध्ये नियुक्त होते. हा विभाग मुंबई क्राईम ब्रांचच्या अंर्तगत येतो. त्यामुळे सचिन वाझे यांचे डिटेक्शन क्राईम ब्रांचचे उपायुक्त प्रकाश जाधव, जॉईंट सिपी मिलिंद भारंबे हे वरिष्ठ होते. त्यांना रिपोर्ट करणे वाझे यांना बंधनकारक होतं.  मात्र, सचिन वाझे हे थेट तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्या संपर्कात होते. त्यामुळे सचिन वाझे यांच्या कामाची कार्यपद्धती काय होती हे एनआयएच्या अधिकाऱ्यांना जाणून घ्यायची आहे. दरम्यान,  NIA च्या आधिकाऱ्यांनी सचिन वाझेंच्या घराची झाडाझडती केली होती. त्यावेळी एक ड्रेस जप्त करण्यात आला आहे. स्फोटकांनी भरलेली कार ठेवण्यासाठी दोन ड्रेस वापरण्यात आले होते.  त्यातला एक शर्ट मुलूंड टोलनाक्याजवळ केरोसीनने जाळला होता. बुधवारी रात्री वाझेंच्या घराच्या झडतीत एक कार जप्त केली आहे. शत्रूघ्न सिंन्हा यांनी खाल्ला असता मार; शशी कपूर पट्टा घेऊन धावले होते मागे या कारमध्ये काही महत्वाचे पुरावे सापडले आहे. अन्य इतर 3 कारचा शोध NIA कडून सुरू आहे. सचिन वाझेंसोबत जो दुसरा व्यक्ती कटात होता त्याचाही शोध लागला असून तो NIA च्या ताब्यात आहे.  ती व्यक्ती पोलीस दलातील असल्याची माहिती NIA च्य सूत्रांनी दिली आहे.  हा संपूर्ण कट फक्त पब्लिसीटीसाठी केला असल्याची NIA ला दाट शक्यता आहे.

तुमच्या शहरातून (मुंबई)

Published by:sachin Salve
First published:

Tags: Mumbai police, Nia, Sachin vaze, मुंबई पोलीस

पुढील बातम्या