नवी दिल्ली 18 मार्च : सोशल मीडियावर रिअॅक्शन व्हिडीओला (Reaction Video) चांगलीच पसंती मिळते. रिअॅक्शन व्हिडीओ म्हणजेच काही लोक लोकांच्या नजरेस पडणार नाही अशा ठिकाणी कॅमेरा ठेवतात आणि मग लोकांचं लक्ष वेधणाऱ्या काही गोष्टी करुन यावर त्यांची रिअॅक्शन काय आहे हे पाहातात. सामान्य नागरिक थांबून समोरच्याला मदत करतात की मग पळून जातात हे या माध्यमातून पाहिलं जातं. असे अनेक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. ट्विटरवर एक व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral on Twitter) होत आहे. यात एक मुलगा भररस्त्यात एका तरुणीचं अपहरण (Kidnapping Video) करतो. तो तरुणीला उचलून कारमध्ये बसवण्याचा प्रयत्न करतो. यावेळी अनेकजण तिची मदत करण्याऐवजी घाबरुन तिथून पळ काढतात. आयपीएस ऑफिसर दीपांशू काबरा यांनी हा व्हिडीओ शेअर करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये असं दिसतं, की एक व्यक्ती कारमधून खाली उतरतो आणि जवळूनच जात असलेल्या एक मुलीला उचलतो. ही घटना पाहून आसपासचे लोक घाबरुन तिथून पळ काढतात. व्हिडीओमध्ये काही असेही लोक आहेत जे या तरुणीच्या मदतीला येत आहेत आणि तिला वाचवत आहेत.
इस परिस्थिति में नागरिक जैसा React करते हैं, उससे तय होता है कि देश का सामाजिक उत्थान होगा या पतन.
— Dipanshu Kabra (@ipskabra) March 16, 2021
देखिये और सोचिये, इनकी जगह आप होते क्या रुककर मदद करते? या भाग जाते? pic.twitter.com/34MwEL5bY8
आयपीएस ऑफिसरची प्रतिक्रिया - दीपांशू काबरा (IPS Officer Dipanshu Kabra) यांनी हा व्हिडीओ शेअर करत लिहिलं, या परिस्थितीवर नागरिक जशाप्रकारे रिअॅक्ट होतात यावरुन ठरतं की देशाची स्थिती नेमकी काय आहे. देश पुढे जात आहे की अधोगती होत आहे. पाहा आणि विचार करा. यांच्या जागी तुम्ही असता तर काय केलं असतं? तुम्ही थांबून मदत केली असती की पळ काढला असता?