मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Sachin Vaze Arrest Update : सचिन वाझे यांना 25 मार्चपर्यंत NIA कोठडी

Sachin Vaze Arrest Update : सचिन वाझे यांना 25 मार्चपर्यंत NIA कोठडी

अटक केल्यानंतर सचिन वाझे यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यानंतर मुंबई सेशन कोर्टामध्ये हजर करण्यात आले होते.

अटक केल्यानंतर सचिन वाझे यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यानंतर मुंबई सेशन कोर्टामध्ये हजर करण्यात आले होते.

अटक केल्यानंतर सचिन वाझे यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यानंतर मुंबई सेशन कोर्टामध्ये हजर करण्यात आले होते.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 14 मार्च : मुंबईमध्ये स्फोटकांनी गाडी सापडल्या प्रकरण मुंबई पोलीस दलाचे अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थान एनआयए (NIA) संस्थेनं अटक केली होती. सचिन वाझे यांना मुंबई सत्र न्यायालयात (Mumbai sessions court) हजर केले असता 25 मार्चपर्यंत  एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे.

स्फोटकांनी भरलेल्या गाडी प्रकरणी शनिवारी 13 तास सचिन वाझे यांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर रात्री उशिरा अटक करण्यात आली होती. अटक केल्यानंतर आज सकाळी सचिन वाझे यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना मुंबई सेशन कोर्टामध्ये हजर करण्यात आले होते. जवळपास 30 मिनिटांच्या युक्तिवादानंतर सचिन वाझे यांना 25 मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, NIA ने ताब्यात घेतलेली पांढऱ्या रंगाची इनोव्हा कारही शनिवारी रात्री मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या (Mumbai Police Commissioner office) जवळून ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. ही कार गेल्या अनेक दिवसांपासून परिसरातच उभी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कारच्या मागे मुंबई पोलीस असं लिहिलं आहे. त्यामुळे या कार मागे पोलीस कनेक्शन बोलले जात आहे. त्यामुळे या प्रकरणी आणखी पोलिसांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

ममता दीदीचं व्हील चेअरवर शक्तीप्रदर्शन; 'त्या' घटनेबाबत निवडणूक आयोग म्हणालं...

दरम्यान, स्फोटकांनी भरलेली गाडी प्रकरणाच्या कटात 5-7 जणांचा समावेश होता. सूत्रांनुसार, NIA ने याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात मुंबई पोलीस (Mumbai Police) दलातील आणखी काही अधिकाऱ्यांची देखील चौकशी होऊ शकते. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये खळबळ उडाली आहे. आता या घटनेची पाळमुळं कुठवर जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

दहशतवादी संघटनेशी संबंध नाही!

एनआयएच्या तपासात आणखी एक माहिती समोर आली आहे ती म्हणजे ठाणे याठिकाणाहून आणखी 3 जणांच्या अटकेची शक्यता आहे. याप्रकरणी इनोव्हा गाडीतून जाणारे दोन्ही चालक आणि एका व्यावसायिकाला अटक होऊ शकते.

10 वर्षाच्या मुलीने गळफास लावून केली आत्महत्या; कारण ऐकून बसेल धक्का

मुंबईमध्ये जिलेटिन स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा अखेर एनआयएच्या पथकाने छडा लावला आहे. स्फोटकांनी भरलेली गाडी प्रकरणात दहशतवादी संघटनेशी कोणताही संबंध नाही. स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवण्याची जबाबदारी एका दहशतवादी संघटनेनं घेतली होती. तो टेलिग्रामवरील मेसेज निव्वळ खोडसाळपणा होता, अशी माहिती NIA च्या दिल्ली स्पेशल सेलने दिली आहे. जैश अल हिंद नावाने कोणतीही संघटना नाही. मात्र, गाडी मायकल रोडवर ठेवण्याचा उद्देश अस्पष्ट आहे.

First published:

Tags: Devendra Fadnavis, Police arrest, Police commissioner, Sachin vaze, मुंबई पोलीस