मुंबई,16 मार्च : मुंबईत (Mumbai) स्फोटकांनी कार सापडल्या प्रकरणी सचिन वाझे (Sachin Vaze arrest) यांच्या अटकेनंतर रोज नवनवीन खुलासे होत आहे. 25 फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली हिरव्या रंगाची गाडी सापडल्यानंतर तपास मुंबई क्राईम ब्रांचच्या (Mumbai police crime branch) CIU ने म्हणजेच क्राईम इंटेलिजन्स युनिटने (Crime Intelligence Unit) तपास सुरू केला होता. याच पार्श्वभूमीवर 27 फेब्रुवारीला CIU युनिटचे प्रमुख सचिन वाझे हे राहत असलेल्या ठाण्यातील साकेत काॅम्पलेक्स (Saket Complex Thane) इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज (CCTV Video) डीव्हीआर सहित घेवून गेले होते आणि धक्कादायक म्हणजे, सचिन वाझे यांची CIU ची टीमच हे सीसीटीव्ही फुटेज घेवून गेली होती. त्यामुळे आता हा प्रश्न उपस्थित होत आहे की, हे सीसीटीव्ही फुटेज तेही सचिन वाझे हे राहत असलेल्या इमारतीचेच फुटेज CIU चे अधिकारी यांनी का नेले असेल?
सचिन वाझे हे ठाणे येथील साकेत काॅम्पलेक्समध्ये राहतात. 27 फेब्रुवारीच्या दिवशी साकेत काॅम्पलेक्स येथे CIU टीमचे साहय्यक पोलीस निरीक्षक रियाजुद्दीन काझी, साहय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश ओव्हाळ, पोलीस नाईक युवराज शैलार आणि पोलीस काॅन्स्टेबल शिवाजी देसले हे पोहचले. सुरुवातीला त्यांनी तपासाकामी सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज पाहिजे, असं सोसायटी कार्यालयातील सदस्यांना सांगितले पण 'लेखी दिल्याशिवाय असं आम्ही काहीच करू शकत नाही', असं सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील कोरोनाचा आकडा पाहून PM मोदींचं टेन्शन वाढलं; CM शी करणार चर्चा
त्यानंतर या चौघांनी एका कागदावर लिहून ते सोसायटी पदाधिकाऱ्यांना दिलं त्यात त्यांनी पुढील प्रमाणे मजकूर लिहिला होता. “सेक्शन 41 CRPC कलमानुसार, आम्ही साकेत सोसायटीला ही नोटीस देतोय की, मुंबई क्राईम ब्रांच CIU DCB CID MUMBAI यांनी रजिस्टर केलेल्या क्राइम रजिस्टर 40/21 गुन्ह्यानुसार, कलम 286, 465, 473, IPC 120 (B), INDIAN EXPLOSIVE ACT 4 (a)(b)(i) गुन्हा दाखल आहे या गुन्ह्यांत तपासकामी आम्हाला आपल्या साकेत सोसायटीच्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पाहिजे आहे. त्यानुसार, आपल्या इमारतीतील 2 DVR हे आम्हास घेवून जायचे आहेत. या नोटीसीनुसार आम्ही आपल्या सीसीटीव्ही फुटेज द्यायचे आदेश देतोय” खाली CIU DCB CID युनिटचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रियाजुद्दीन काझी यांनी सही केली आहे आणि दोन डीव्हीआर सीसीटीव्ही फुटेज जप्त करुन घेवून गेले.
मुंबईच्या रस्त्यावर 'बर्निंग कार'चा थरार, इनोव्हा गाडी पूर्णपणे जळून खाक
आता प्रश्न हा उपस्थित होतो की, सचिन वाझे यांच्याच घरचे सीसीटीव्ही फुटेज या CIU टीमने का जप्त केले आणि तेही कोणाच्या सांगण्यावरून त्यांनी हे जप्त केले आणि पुढे या फुटेजचे काय केले? हा सर्व प्रकार सचिन वाझे यांच्यासह त्यांचे वरीष्ठ पोलीस उपायुक्त तसंच पोलिस सहआयुक्त यांना माहिती होता का? असे अनेक प्रश्न अनुत्तरीतच आहेत.
दरम्यान, CIU पाठोपाठ महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथक देखील 14 मार्चला या सीसीटीव्ही फुटेज संदर्भात चौकशी करायला गेले होते. मात्र CIU टीमने ते फुटेज आधीच नेल्याचे कळल्यावर महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाला काहीच मिळाले नाही तर या संदर्भात ४ मार्चलाच सोसायटीने राबोडी पोलिसांना एक पत्र लिहिले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cctv footage, Crime, Mumbai crime branch, Sachin vaze