मुंबई, 15 मार्च : महाराष्ट्रातील कोरोनाचा (Coronavirus in maharashtra) झालेला विस्फोट पाहून आता केंद्र सरकारचीही चिंता वाढली आहे. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः अॅक्शनमध्ये आले आहेत. स्वत: मोदी थेट मुख्यमंत्र्यांसोबतच चर्चा करणार आहेत आणि राज्यातील कोरोनाला (maharashtra corona cases) नियंत्रित करण्यासाठी मोदी सरकारनं हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यात आज तब्बल 15,051 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कालच्या तुलनेत हा आकडा थोडा कमी झाला असला तरी देशातील सर्वाधिक कोरोना प्रकरणं महाराष्ट्रातच आहेत. देशातील सर्वात जास्त अॅक्टिव्ह केसेस असलेले सर्वात जास्त जिल्हेही महाराष्ट्रातच आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाला नियंत्रित करण्याचं मोठ आव्हान सरकारसमोर आहे.
दिवसरातील एकूण 15,051 नव्या प्रकरणांपैकी 1713 प्रकरणं मुंबईत आहेत. पुण्यात आज 1122 कोरोन रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईतील आकडा वाढताच आहे, तर पुण्यातील केसेस आज कमी झाले आहेत. तर नागपूरने मात्र मुंबई, पुण्यालाही मागे टाकलं आहे. नागपुरात 2094 केसेस नोंदवले गेले आहेत. हे वाचा - Explainer: सध्याच्या स्थितीत लॉकडाऊनचं धोरण का योग्य नाही? वाचा जाणकाराचं म्हणणं कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींचंही टेन्शन वाढलं आहे. कोरोनाचा धोका आणि कोरोना लशीबाबत ते आता थेट मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. मोदी मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक करणार आहेत. 17 मार्च दुपारी 12 वाजता मुख्यमंत्र्यांसोबत बोलणार आहेत. हे वाचा - Jalgaon Update : Covid क्वारंटाइन सेंटरमधून 15 रुग्ण फरार; पोलिसांची धावाधाव दरम्यान राज्यात नागरिक कोरोनाला गांभीर्याने घेत नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. राज्यात वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाऊन हा पर्याय नसून निर्बंध अधिक कठोर केले जातील. राज्यातील जनतेने कोरोना नियमांचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना केले.