मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Sachin Vaze प्रकरणाला धक्कादायक वळण, इनोव्हा गाडी चालवणाऱ्याची माहिती आली समोर

Sachin Vaze प्रकरणाला धक्कादायक वळण, इनोव्हा गाडी चालवणाऱ्याची माहिती आली समोर

घटनास्थळावर आणखी एक इनोव्हा कार आढळून आली होती. ही पांढऱ्या रंगाची इनोव्हा गाडी सचिन वाझेच चालवत होते...

घटनास्थळावर आणखी एक इनोव्हा कार आढळून आली होती. ही पांढऱ्या रंगाची इनोव्हा गाडी सचिन वाझेच चालवत होते...

घटनास्थळावर आणखी एक इनोव्हा कार आढळून आली होती. ही पांढऱ्या रंगाची इनोव्हा गाडी सचिन वाझेच चालवत होते...

मुंबई, 17 मार्च : मुंबईतल्या दक्षिण मुंबई येथील मायकल रोडवर (Mumbai Carmichael Road) हिरव्या रंगाची स्फोटकांनी भरलेली गाडी सापडलेल्या प्रकरणी नवनवीन खुलासे समोर येत आहे. आतापर्यंत त्या पीपीई कीटमधील व्यक्तीबद्दल संशय व्यक्त केला जात होता. पण, स्फोटकांनी भरलेली गाडी ही सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्याच सहकाऱ्यांनी तिथे सोडली असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. एवढंच नाहीतर इनोव्हा कार सुद्धा सचिन वाझे हेच चालवत होते.

25 फेब्रुवारी रोजी कार मायकल रोडवर जिलेटीन स्फोटकांनी कार सापडली होती. त्यानंतर घटनास्थळावर आणखी एक इनोव्हा कार आढळून आली होती. ही पांढऱ्या रंगाची इनोव्हा गाडी सचिन वाझेच चालवत होते, अशी माहिती NIA च्या सूत्रांनी दिली आहे. तसंच, हिरवी स्कॉर्पिओ आणि पांढरी गाडी चालवणारे दुसरे तिसरे कोणी नसून CIU चे पोलीस होते.

फुलराणी झाली 31 वर्षांची! ...म्हणून आजीने महिनाभर पाहिलं नव्हतं सायनाचं तोंड

स्कॉर्पिओ गाडी उभी करून पांढऱ्या गाडीतून सचिन वाझे आणि आणखी दोन CIU चे अधिकारी बसून मुलूंड टोल नाक्यावरुन ठाण्याला गेले होते  हिरवी आणि पांढऱ्या रंगाची इनोव्हा आणि स्कॉर्पिओ गाडी ठाणे येथेच पार्क केली होती, अशी माहितीही समोर आली आहे.

दरम्यान, सचिन वाझे  यांना अटक करण्यात आली. त्यानंतर वाझे यांचं घर, ऑफिस, गाडी अशा विविध गोष्टींचा तपास करण्यात येत आहे. अशातच सचिन वाझे हे वापरत असलेल्या एक महागडी गाडी जप्त करण्यात आली आहे.

Explainer : चीनवर घोंघावतंय का घोंघावतंय पिवळं विनाशकारी वादळ?

सचिन वाझे ही कार वापरत होते. या महागड्या गाडीत चक्क नोटा मोजण्याची मशीन सापडली आहे. तसंच या गाडीत 5 लाख रुपयेही आढळून आले आहेत. वाझेंच्या गाडीत पैसे मोजण्याचं मशीन का ठेवण्यात आलं होतं, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

First published:

Tags: Car, Crime, Police commissioner, Sachin vaze