मुंबई, 29 मार्च : मुंबईतील मायकल रोडवर (carmichael road) स्फोटकांनी भरलेल्या हिरव्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडी संदर्भात अनेक पुरावे नष्ट करण्याचे काम सचिन वाझे (Sachin Vaze) आणि टीमने केले होते. याच संदर्भात सचिन वाजे याचे खासमखास मुंबई क्राइम ब्रांचचे (Mumbai Crime Branch) पोलीस उपनिरीक्षक रियाजुद्दीन काझी (Riazuddin Qazi) यांचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.
25 फेब्रुवारीला दक्षिण मुंबईतील कार मायकल रोडवर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. यासंदर्भातील पुरावे नष्ट करण्याकरता रियाजुद्दीन काझी मुंबईतील विक्रोळी कन्नमवार नगर येथे असलेल्या बंटी नावाच्या एका गॅरेज मध्ये गेले होते. त्या ठिकाणी असलेला सीसीटीव्हीचा डीव्हीआर रियाजुद्दीन काझी त्यांनी ताब्यात घेतला तसंच गॅरेज चालक सावंत नावाच्या व्यक्तीला देखील चौकशी करता घेऊन गेले होते. मात्र या संदर्भातील कोणतीच माहिती त्यांनी मुंबई क्राईम ब्रांचच्या मुद्देमाल नोंदीत किंवा स्टेशन डायरीत नमूद केले नव्हते.
कर्जत नेरळ मार्गावर कारची रिक्षाला धडक, CNG टाकीच्या स्फोटात 4 ठार
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, याच बंटी गॅरेजमध्ये सचिन वाझे टीमने गाड्यांसाठी विविध प्रकारच्या बनावट नंबर प्लेट बनवल्या होत्या. या गोष्टी कुठे तपासात समोर येऊ नये या करता पुरावे नष्ट केले जात होते. यादरम्यान रियाजुद्दीन काझी हे विक्रोळी कन्नमवार नगर येथील बंटी नावाच्या गॅरेजमध्ये गेले होते आणि हा प्रकार जवळच असलेल्या एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. तो आता तपास यंत्रणांच्या हाती लागला आहे. यावरूनच रियाजुद्दीन काझी काळजी यांची चौकशी देखील करण्यात आली होती.
गर्भवतीला कडक उन्हात 3 किमी पायी चालण्यास भाग पाडलं, महिला पोलीस अधिकारी निलंबित
25 फेब्रुवारीला कार मायकल रोडवर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती त्यानंतर एकेक करून 26 आणि 27 फेब्रुवारी दरम्यान ठाण्यातील सचिन वाझे राहत असलेल्या साकेत कॉम्प्लेक्स इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज त्याचबरोबर ठाण्यातील सद्गुरू कार डेकोर या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तसाच दुकानातील सर्व रेकॉर्ड आणि विविध प्रकारचे पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने ताब्यात घेतले होते आणि सर्व पुरावे त्यांनी देखील नष्ट केल्याचे एनआयएच्या तपासात समोर आले आहे. NIA टीमने रियाजुद्दीन काझी यांची तब्बल पाच दिवस रोज सलग 10 तास चौकशी देखील केली होती. याच दरम्यान रियाजुद्दीन काझी ते माफीचे साक्षीदार बनणार असल्याची चर्चा समोर आली. याबरोबरच तपास यंत्रणांच्या हाती एकेक करून जे धक्कादायक पुरावे हाती लागलेत या संदर्भांची माहिती रियाजुद्दीन काझी यांच्या चौकशीत देखील समोर आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.