जाहिरात
मराठी बातम्या / देश / गर्भवतीला कडक उन्हात 3 किमी पायी चालण्यास भाग पाडलं, महिला पोलीस अधिकारी निलंबित

गर्भवतीला कडक उन्हात 3 किमी पायी चालण्यास भाग पाडलं, महिला पोलीस अधिकारी निलंबित

राखाडी रंगाचा स्त्राव होणं. योनी मार्गातील इन्फेक्शनचं लक्षण आहे. यालाच बॅक्टेरियल वेजाइनोसिस म्हटलं जातं. गर्भावस्थेच्या काळात असा रक्तस्त्राव होणं गर्भापातचं लक्षण असू शकतं.

राखाडी रंगाचा स्त्राव होणं. योनी मार्गातील इन्फेक्शनचं लक्षण आहे. यालाच बॅक्टेरियल वेजाइनोसिस म्हटलं जातं. गर्भावस्थेच्या काळात असा रक्तस्त्राव होणं गर्भापातचं लक्षण असू शकतं.

या घटनेनंतर महिला पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

ओडिसा, 29 मार्च : ओडिसामध्ये (Odisha) एका गर्भवती महिलेला (Pregnant Woman) कडाक्याच्या उन्हात 3 किलोमीटरपर्यंत पायी चालण्यास भाग पाडल्याच्या  आरोपाखाली एक महिला पोलीस अधिकाऱ्याला निलंबित केलं आहे. पोलिसांनी सांगितलं की, आदिवासी बहुल भागात मयूरभंज जिल्ह्यातील (Mayurbhanj) पोलीस अधीक्षक (SP) स्मिथ परमार यांनी रविवारी शरत ठाणे प्रभारी रीना बक्सला यांना निलंबित केलं. बक्सला यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी हेल्मेटच्या तपासणीदरम्यान एका गर्भवती महिलेला कडक उन्हात 3 किलोमीटर पायी चालण्यास भाग पाडलं. पोलिसांनी या प्रकरणात माहिती देत सांगितलं की, विक्रम बारुली नावाची व्यक्ती रविवारी आपल्या 8 महिन्यांची गर्भवती पत्नीसोबत मोटरसायकलवरुन रुग्णालयात तिचा चेकअप करण्यासाठी जात होते. यादरम्यान त्याच्या पत्नीने हेल्नेट घातलं नव्हतं. हे पाहून तेथे उपस्थित महिला पोलीस अधिकारी रीना बक्सला यांनी दोघांना रोखलं आणि हेल्नेट न घातल्यामुळे दंड लावला. महिला अधिकारीने विक्रमला एमवी अॅक्टअंतर्गत वाहतूक नियमांचं उल्लंघन करण्यासाठी दंड लावला. बारुलीने सांगितलं की, तो दंडाची रक्कम ऑनलाइन करू इच्छित होती. मात्र महिला अधिकाऱ्याने त्याचं ऐकलं नाही आणि त्याला मोटारसायकलसोबत शरत पोलीस स्टेशनपर्यंत चालत येण्यास सांगण्यात आलं. या दरम्यान त्याची पत्नी कडक उन्हात बराच वेळ रस्त्यावर उभी राहिली. बऱ्याच वेळापर्यंत महिलेचा पती परत आला नाही. त्यामुळे तिच्याजवळ कोणताच पर्याय राहिला नाही, आणि महिला स्वत: पोलीस स्टेशनच्या दिशेने चालू लागली. यादरम्यान गर्भवती महिलेला तब्बल 3 किलोमीटरपर्यंत पायी चालावं लागलं. इतक्या कडक उकाड्यात 3 किमीपर्यंत चालावं लागल्याने गर्भवती महिलेला खूप त्रास सहन करावा लागला. यानंतर दाम्पत्याने उप-विभागीय पोलीस अधिकारी  (Sub-divisional police officer) जवळ महिला अधिकारी विरोधात तक्रार दाखल केली आहे. हे ही वाचा- मद्यधुंद तरुणाचा चाकू घेवून रस्त्यावर हैदोस, एका जणाला भोसकले; महिलेचा कापला कान व्यक्तीने आपल्या तक्रारीत म्हटलं की, शरत पोलीस स्टेशनचे अधिकारी स्वत: एक महिला आहे. मात्र त्यांनी माझ्या पत्नीसाठी समानुभूतीही दाखवली नाही. मी त्यांना ऑनलाइन दंडाची रक्कम घेण्याची विनंती केली. मात्र त्यांनी ऐकलं नाही. मी त्यांना आपल्या पत्नीला सोबत घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची प्रार्थनादेखील केली. मात्र माझी पत्नी रस्त्यावर एकटी उभी राहिली व त्या मला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेल्या. मयूरभंजच्या एसपींनी सांगितलं की, महिला अधिकारीने आपलं कर्तव्य योग्य पद्धतीने न निभावल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. लवकरच तिच्याविरोधात विभागीय तपास सुरू केला जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: odisha
  • First Published :
जाहिरात
जाहिरात