मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /कर्जत नेरळ मार्गावर कारची रिक्षाला धडक, CNG टाकीच्या स्फोटात 4 ठार

कर्जत नेरळ मार्गावर कारची रिक्षाला धडक, CNG टाकीच्या स्फोटात 4 ठार

कार आणि रिक्षाची धडक झाल्यानंतर CNG टाकीचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की....

कार आणि रिक्षाची धडक झाल्यानंतर CNG टाकीचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की....

कार आणि रिक्षाची धडक झाल्यानंतर CNG टाकीचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की....

कर्जत, 29 मार्च : कर्जत-नेरळ रोडवर (Karjat Neral road ) कार आणि रिक्षाचा (Car accident) भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर दोन्ही गाड्यांनी पेट घेतला. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  आज दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास कर्जत-नेरळ रोडवर हा अपघात घडला आहे.  डिकसळ येथे हुंदई कार कार आणि रिक्षाची धडक झाली. कार आणि रिक्षाची धडक झाल्यानंतर CNG टाकीचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, काही कळायच्या आत दोन्ही वाहनांनी पेट घेतला.  अचानक झालेल्या या स्फोटात 2 महिला, 1 लहान मुलगा आणि 1 पुरुष असे 4 जण जागीच ठार झाले.

प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, महामार्गावरून जात असताना अचानक  रिक्षा हॉस्पिटलकडे वळला. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या भरधाव हुंदई कारने असताना मागून जोरात धडक दिली. कारच्या धडकेनंतर  रिक्षातील CNG सिलेंडरचा स्फोट झाला.

जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात नगरसेवकाची हत्या, पोलीस कर्मचारी शहीद

अचानक दोन्ही वाहनांनी पेट घेतल्यामुळे मदतीसाठी कुणीही पुढे येऊ शकले नाही. अग्निशमन दलाची गाडी पोहोचली पण तोपर्यंत बरात उशीर झाला होता. तात्काळ मदत मिळाली असती तर जीव वाचू शकले असते, असं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे.

या अपघातात दोन्ही वाहनं जळून खाक झाली आहे. रिक्षा ही कल्याण येथील असल्याची माहिती मिळत आहे. या अपघाताचा पोलीस अधिक तपास करत आहे.

First published:

Tags: कर्जत