मुंबई, 18 मार्च : मुंबईतल्या (Mumbai) कार माइकल रोडवर स्फोटकांनी भरलेली हिरव्या रंगाची गाडी पार्क केल्या प्रकरणी वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना एनआयएने (NIA) अटक केल्यानंतर आता या प्रकरणी एका पोलीस अधिकाऱ्याला देखील अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण हा पोलीस अधिकारी तीच व्यक्ती आहे ज्या व्यक्तीने सचिन वाझे यांच्यासोबत मिळून हा सर्व गुंतागुतीचा कट रचला होता. एवढंच नाही तर पुरावे नष्ट करण्याची जबाबदारी देखील याच पोलीस अधिकाऱ्यावर होती.
मिळालेल्या माहितीनुसार, या पोलीस अधिकाऱ्याने दक्षिण मुंबईतील कार मायकल रोडवर पार्क केलेल्या हिरव्या रंगाच्या गाडी प्रकरणी अनेक पुरावे मिटवले आहे. तसंच तपासात अनेक महत्त्वाच्या साक्षी, साक्षीदार देखील या पोलीस अधिकाऱ्याने नोंदवल्या नाही. तर अनेक साक्षीदारांना धमकावून त्यांना घडलेल्या घटनेच्या विरुद्ध साक्षी द्यायला भाग पाडले, असा संशय एनआयएच्या अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे एनआयएचे अधिकारी सुरुवातीपासून या पोलीसच्या मागावर होते. ही व्यक्ती आता एनआयएच्या ताब्यात असून या व्यक्तीची कसून चौकशी सुरू आहे.
BREAKING : 10 वी आणि 12वीच्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना महत्त्वाची सूचना
तर जिलेटिनच्या कांड्या आणण्यात या पोलिसाचा महत्त्वाचा सहभाग मानला जातोय. शिवाय धमकीचे पत्र लिहिण्याचे डोके देखील याच पोलिसाने लढवले होते, अशी माहिती एनआयएच्या अधिकार्यांना दिली आहे. त्यामुळे सचिन वाझे यांच्या अटकेनंतर हा पोलीस देखील महत्त्वाचा मानला जात आहे. गाड्यांचे नंबर प्लेट बोगस बनवणे तसंच या नंबर प्लेट ज्यांनी बनवलेल्या आहेत, त्यांचे सर्व रेकॉर्ड सीसीटीव्ही ताब्यात घेऊन मिटवणे ते काम देखील या अधिकाऱ्यांनी केल्याचे एनआयएला संशय आहे.
ममता सरकारचा पराभव पक्का', मोदींचा दावा! 'खेला होबे' घोषणेलाही दिलं उत्तर
मनसुख मिश्रीलाल हिरेन (Mansukh Hiren murder case) यांच्या गायब होण्यामागे देखील याच व्यक्तीचा हात आहे, असे देखील म्हटले जाते आहे. मनसुख हिरेन यांचा मोबाईल फोन वसईच्या मांडवी आणि तुंगारेश्वर या भागात स्विच ऑन करण्यात आला होता. या घटनेची देखील या व्यक्तीचा संबंध आहे, असा अंदाज एनआयएला आहे. त्यामुळे स्फोटकांनी भरलेली हिरव्या रंगाची गाडी या प्रकरणाचा कट रचण्यात आला होता. त्याचा पर्दाफाश एनआयएने केला आहे. पण एनआयएने ताब्यात घेतलेल्या या पोलिसांमुळे मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कट देखील उघडकीस येऊ शकतो, असा विश्वास एनआयएच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Hiren mansukh, Mumbai, Mumbai police, Police arrest