Home /News /kolhapur /

पोलीस ठाण्यातही महिला असुरक्षित; पगार देण्याच्या बहाण्यानं बोलवलं अन्..., कोल्हापुरातील खळबळजनक घटना

पोलीस ठाण्यातही महिला असुरक्षित; पगार देण्याच्या बहाण्यानं बोलवलं अन्..., कोल्हापुरातील खळबळजनक घटना

Crime in Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले पोलीस ठाण्यात साफसफाईचं काम करणाऱ्या एका महिलेसोबत पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यानं गैरप्रकार केला आहे.

    कोल्हापूर, 09 ऑक्टोबर: गेल्या काही दिवसांत घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांमुळे (Crime against women) राज्यात महिला सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. असं असताना, कायद्याचं रक्षण करणाऱ्या पोलीस ठाण्यातच एका महिलेसोबत अश्लील वर्तन (Sexual molestation) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले पोलीस ठाण्यात साफसफाईचं काम करणाऱ्या एका महिलेची पोलीस ठाण्यात छेड काढण्यात (sexual molestation in hatkanangale police station) आली आहे. पोलीस ठाण्यातील कारकूनानं महिलेला पगार देण्याच्या बहाण्यानं कार्यालयात बोलवून तिच्यासोबत गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला आहे. ही संतापजनक घटना घडल्यानंतर पीडित महिलेनं या घटनेची तक्रार पोलीस ठाण्यातील वरिष्ठांकडे केली असता, वरिष्ठ पोलिसांनी देखील हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच पीडित महिलेवर दबाव टाकून झालेल्या घटनेबाबत कोणतीही तक्रार नसल्याचं कॅमेऱ्यासमोर बोलायला भाग पाडलं आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित संशयित आरोपी कारकूनाला सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. हेही वाचा-'...तुम्हाला काम देतो' सांगत डोंगरावर नेऊन महिलेसोबत भयावह कृत्य; पुण्यातील घटना सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला हातकणंगले पोलीस ठाण्यात रोजंदारीवर साफसफाईचं काम करते. पीडित महिला गुरुवारीही नेहमीप्रमाणे पोलीस ठाण्यात काम करण्यासाठी आली असता, संबंधित कारकूनानं तिला आपल्या कार्यालयात बोलवलं. याठिकाणी पगार देण्याचा बहाणा करत आरोपीनं पीडित महिलेशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला आहे. हेही वाचा-कारखाना मालकांकडून विवाहितेसोबत विकृतीचा कळस; 31 वर्षांपासून देत होते नरक यातना पीडित महिलेनं हा प्रकार पोलीस ठाण्यातील अन्य कर्मचाऱ्यांना सांगितला, त्यानंतर हे प्रकरण पोलीस निरीक्षकापर्यंत पोहोचलं. यानंतर त्यांनी पीडित महिलेची समजूत काढून पोलीस ठाण्याची बदनामी टाळण्यासाठी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी माहिती देताना, पोलीस निरीक्षक के एन पाटील यांनी सांगितलं की, पीडित महिलेनं याबाबत कोणतीही तक्रार केली नाही, त्यामुळे कारवाईचा प्रश्नच निर्माण होत नाही. पीडितेनं तक्रार दाखल केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Kolhapur

    पुढील बातम्या