मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मुंबईच्या महापौरपदासाठी रितेश देशमुख आणि सोनू सूदला उमेदवारी, काँग्रेसमधून नवी मागणी

मुंबईच्या महापौरपदासाठी रितेश देशमुख आणि सोनू सूदला उमेदवारी, काँग्रेसमधून नवी मागणी


आता हा अहवाल या नेत्यांच्या कमिटीसमोर संबंधित रिपोर्ट ठेवण्यात येईल. त्यानंतर काँग्रेस वरिष्ठ नेते याबाबत भूमिका घेतील.

आता हा अहवाल या नेत्यांच्या कमिटीसमोर संबंधित रिपोर्ट ठेवण्यात येईल. त्यानंतर काँग्रेस वरिष्ठ नेते याबाबत भूमिका घेतील.

आता हा अहवाल या नेत्यांच्या कमिटीसमोर संबंधित रिपोर्ट ठेवण्यात येईल. त्यानंतर काँग्रेस वरिष्ठ नेते याबाबत भूमिका घेतील.

मुंबई, 23 ऑगस्ट : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (mumbai municipal corporation election) सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. तर काँग्रेसने (congress) पुन्हा एकदा मुंबईत सेलिब्रिटी कार्ड वापरण्याची तयारी सुरू केली आहे. काँग्रेसकडून थेट रितेश देशमुख (ritesh deshmukh) आणि सोनू सूद (sonu sood) यांना महापौरपद म्हणून उमेदवारी द्यावी, असा प्रस्तावच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांने मांडला आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. काँग्रेस पदाधिकारी गणेश कुमार यादव (ganesh kumar yadav) या मुंबई काँग्रेसच्या स्ट्रॅटेजी कमिटी सचिवाकडून एक अहवाल समोर आला आहे.  मुंबई महापालिका निवडणकीत  रितेश देशमुख, सोनू सूद किंवा मिलिंद सोमण यांच्या नावांचा विचार करण्याचा सल्ला या अहवालात देण्यात आला आहे.  मुंबई महापौरपदासाठी राजकीय नेत्या ऐवजी सेलिब्रिटी चेहरा ठेवावा, यावर विचार करण्याचा सल्ला या अहवालात देण्यात आला आहे.

तालिबान्यांनी सीमा ओलांडली; जेवण आवडलं नाही म्हणून भरचौकात महिलेला जाळलं

काँग्रेस पक्षाच्या स्ट्रॅटेजी कमिटीचे एच.के.पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबईचे अध्यक्ष भाई जगताप, पालकमंत्री अस्लम शेख, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे,  विरोधी पक्ष नेते रवी राजा हे सर्व नेते आहेत.

आता हा अहवाल या नेत्यांच्या कमिटीसमोर संबंधित रिपोर्ट ठेवण्यात येईल. त्यानंतर काँग्रेस वरिष्ठ नेते याबाबत भूमिका घेतील. विशेष म्हणजे, याआधी सुद्धा सेलिब्रेटींना उमेदवारी देणे हा नवीन विषय राहिला नाही. लोकसभा निवडणुकीत  काँग्रेसने उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी दिली होती. याआधीही मुंबईतून अभिनेता गोविंदासह अनेक सेलिब्रिटींनी निवडणूक लढवली आहे.

बहिणीच्या अंगावरील जखमा पाहून भावाचा संताप; मेव्हण्याला मरेपर्यंत मारत राहिला

विशेष म्हणजे, रितेश देशमुख यांचे दोन्ही बंधू  वैद्यकीय मंत्री अमित देशमुख आणि आमदार धीरज देशमुख हे सक्रीय राजकारणात आहे. जर रितेश देशमुख यांनाही उमेदवारी देण्यात आली तर आणखी एक देशमुख सक्रीय राजकारणात एंट्री करेल. पण, तुर्तास तरी याबद्दल काँग्रेसकडून या प्रस्ताव कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. काँग्रेसची समिती यावर चर्चा करून योग्य निर्णय घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

First published:
top videos