मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /बहिणीच्या अंगावरील जखमा पाहून भावाचा संताप; मेव्हण्याला मरेपर्यंत मारत राहिला

बहिणीच्या अंगावरील जखमा पाहून भावाचा संताप; मेव्हण्याला मरेपर्यंत मारत राहिला

शेजारी पडलेला सुरा उचलला आणि मेव्हण्यावर वार केले. जोपर्यंत तो मरत नाही तोपर्यंत मारत राहिला.

शेजारी पडलेला सुरा उचलला आणि मेव्हण्यावर वार केले. जोपर्यंत तो मरत नाही तोपर्यंत मारत राहिला.

शेजारी पडलेला सुरा उचलला आणि मेव्हण्यावर वार केले. जोपर्यंत तो मरत नाही तोपर्यंत मारत राहिला.

उत्तर प्रदेश, 23 ऑगस्ट : कानपुरमधील बिधून गंगापूर कॉलनीत राखी पौर्णिमेच्या दिवशी बहीण राखी बांधण्यासाठी भावाच्या घरी आली होती. यावेळी त्याला बहिणीच्या अंगावर मारल्याचे चट्टे दिसले. मारल्याच्या खूणा पाहून भावाचा मनस्ताप झाला. रागाच्या भरात भावाने मेव्हण्याचा गळा चिरून त्याची हत्या केली. हत्या केल्यानंतर तो तिथच बसला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवलं आहे. भागात राहणारे बीएसएनएलमधून रिटायर्ड रामबाबू मिश्रा यांनी आपली मुलगी संध्या हिचं लग्न तब्बल 14 वर्षांपूर्वी जवळ राहणारे लोडर चालक भानु वाजपेयी (43) याच्यासोबत केलं होतं. त्यांना अनिकेत (22) आणि महक (8) नावाची दोन मुलंही आहेत.

रामबाबु यांनी दिलेल्या माहितीनुसार, भानुले नशेच्या आदी झाला होता. दारूवरुन संध्या आणि भानुमध्ये नेहमी वाद होत होता. हे प्रकरण कोर्टात पोहोचलं होतं. यादरम्यान संध्या तब्बल अडीच वर्षांपर्यंत पतीपासून दूर माहेरी राहत होती. त्यानंतर भानू संध्याला घरी घेऊन गेला होता. मात्र त्याचं दारूचं व्यसन काही केल्या सुटत नव्हतं. त्यानंतरही दोघांमध्ये वाद सुरूच होता. रविवारी सकाळी राखी पौर्णिमेला भानुने संध्या तब्बल 1 किमी लांब राहणाऱ्या भावाच्या घरी सोडलं आणि तो कामावर निघून गेला. यानंतर संध्याचा छोटा भाऊ जो बीएच्या पहिल्या वर्षात शिकतो, त्याने बहिणीच्या शरीरावर मारल्याचे व्रण दिसले. हे पाहून त्याला धक्काच बसला. तो घराबाहेर गेला आणि त्याने दारू प्यायली. सायंकाळी तो घरी परतला तर संध्याला नेण्यासाठी भानुसोबत त्याची भेट झाली. दोघांमध्ये संध्याला मारहाण केल्याबद्दल वाद झाले. यानंतर शेजारी पडलेल्या सुऱ्याने भावाने भानूवर हल्ला केला. ज्यानंतर तो रक्ताळलेल्या अवस्थेत जमिनीवर कोसळला. आरडो ओरडा ऐकून संध्या आणि तिचे वडील पुढे आले, मात्र तोपर्यंत खूप उशिर झाला होता.

हे ही वाचा-सापाने दंश केल्यानंतर भाऊ-बहीण ओरडले; आई मात्र कुशीत घेऊन दोघांनाही झोपवत राहिली

जीव जात नाही तोपर्यंत मारत राहिला

मेव्हण्याची हत्या केल्यानंतर संध्याचा भाऊ तिथचं बसून राहिला. संध्याचं जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा तिचा भाऊ अवघ्या 7 वर्षांचा होता. लहान पणापासून बहिणीला होणारा त्रास पाहून तिच्या भावाला त्रास होत होता. त्याच्या मनात भानुविषयी विष निर्माण झालं होतं. रविवारी बहिणीच्या चेहऱ्यावर जखमा पाहून त्याचा पारा चढला आणि रागाच्या भरात त्याने भानूची हत्या केली. संध्याचा भाऊ भानूचा जीव जाईपर्यंत त्याला मारत होता

First published:
top videos

    Tags: Crime news, Murder, Raksha bandhan