मराठी बातम्या /बातम्या /विदेश /तालिबान्यांच्या क्रूरतेने सीमा ओलांडली; जेवण आवडलं नाही म्हणून भरचौकात महिलेला जिवंत जाळलं

तालिबान्यांच्या क्रूरतेने सीमा ओलांडली; जेवण आवडलं नाही म्हणून भरचौकात महिलेला जिवंत जाळलं

अफगाणिस्तानात तालिबान्यांनी सर्वप्रथम महिलांवर अत्याचार सुरू केले. महिलांसंदर्भात कडक नियम तयार करण्यात आले आहेत.

अफगाणिस्तानात तालिबान्यांनी सर्वप्रथम महिलांवर अत्याचार सुरू केले. महिलांसंदर्भात कडक नियम तयार करण्यात आले आहेत.

अफगाणिस्तानात तालिबान्यांनी सर्वप्रथम महिलांवर अत्याचार सुरू केले. महिलांसंदर्भात कडक नियम तयार करण्यात आले आहेत.

    तालिबान, 23 ऑगस्ट : अफगाणिस्तानमधल्या (Afghanistan) नागरिकांना अनेक वर्षांनंतर दुर्दैवाने पुन्हा एकदा तालिबान्यांच्या (Taliban) क्रूर दहशतवादाचा (Terrorism) अनुभव सध्या घ्यावा लागतो आहे. देशातल्या नागरिकांची परिस्थिती खूप वाईट आहे. खासकरून महिलांची परिस्थिती खूपच बिकट झाली आहे. यापूर्वीही जेव्हा तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला होता, तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींवरून महिलांना मृत्युदंडासारखी कडक शिक्षा दिली जायची. आता पुन्हा एकदा अफगाणिस्तानच्या नागरिकांना त्या नरकयातनांना तोंड द्यावं लागत आहे.

    अफगाणिस्तानमधल्या माजी न्यायाधीश नजला (Najala) यांनी सध्या तिथल्या महिलांवर किती वाईट परिस्थिती ओढवली आहे याबद्दल माहिती दिली. अशा अनेक घटना लोकांपर्यंत येऊच नयेत, यासाठी तिथे प्रयत्न केले जात आहेत. अशाच दाबून टाकण्यात आलेल्या एका प्रकरणाबद्दलची माहिती नजला यांनी स्काय न्यूजला दिलेल्या इंटरव्ह्यूत दिली. एका महिलेला तालिबान्यांनी भर चौकात जिवंत (Burnt Alive) जाळलं. कारण त्यांना तिच्या हातचं जेवण आवडलं नाही, अशी माहिती नजला यांनी दिली. नजला अफगाणिस्तानमध्ये महिलांच्या अधिकारांसाठी (Women Rights) काम करतात. तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा केल्या केल्या लगेचच महिलांवर अत्याचार करायला सुरुवात केली आहे, असं नजला यांनी सांगितलं.

    हे ही वाचा-संतापजनक : "तालिबानी हे महिलांच्या प्रेतावरही बलात्कार करतात!''

    काही दिवसांपूर्वीच तालिबानने सांगितलं, की आपल्याला हिंसा नको आहे. तसंच, इस्लामच्या (Islam) शरिया कायद्यानुसार आपण महिलांना शिक्षण आणि नोकरीची संधीही देणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं. यावरून सर्वांना तालिबानचं स्वरूप बदलल्यासारखं वाटत आहे. प्रत्यक्षात मात्र तसं काहीही झालेलं नाही, असं नजला यांनी सांगितलं. सध्या अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांकडून मोठ्या प्रमाणावर हिंसाचार केला जात आहे. तालिबानी घरोघरी जाऊन नागरिकांकडून धान्य गोळा करत आहेत. तसंच घरातल्या महिलांना जबरदस्तीने जेवण तयार करायला लावत आहेत. ज्यांच्या हातचं जेवण त्यांना आवडतं, त्या महिलांना ते आपल्यासोबत जबरदस्तीने घेऊन जातात, जेणेकरून त्या त्यांच्यासाठी कायमच जेवण तयार करू शकतील. ज्यांच्या हातचं जेवण त्यांना आवडत नाही, त्या महिलांना तालिबानी थेट मारूनच टाकत आहेत, असं नजला यांनी सांगितलं.

    अफगाणिस्तानात तालिबान्यांनी सर्वप्रथम महिलांवर अत्याचार सुरू केले. महिलांसंदर्भात कडक नियम तयार करण्यात आले आहेत. कोणत्याही महिलेने हाय हील्स सँडल्स घातले तर तिला मृत्युदंड ठोठावला जातो. महिलांना तंग कपडे घालण्यासही मनाई आहे. असंही सांगितलं जात आहे, की तालिबानी पैसे मिळवण्यासाठी अफगाणिस्तानमधल्या महिलांना आजूबाजूच्या देशांमध्ये विकत आहेत. तसंच अफगाणिस्तानमध्येही महिलांचा लिलाव केला जात आहे. नोकरदार महिलांना नोकरी करण्यास मनाई असून, त्यांच्यावर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत.

    First published:
    top videos

      Tags: Afghanistan, Taliban