कल्याण, 01 जानेवारी: अंबरनाथ येथून कल्याणला (Kalyan) जाण्यासाठी रिक्षात बसलेल्या पाच जणांनी एका रिक्षाचालकाला मारहाण करून त्याच्याकडील रिक्षासह रोकड लुटली (rickshaw driver looted by 5 passenger) आहे. यानंतर आरोपी रिक्षासह फरार झाले आहेत. रात्री उशिरा घडलेल्या या घटनेनंतर रिक्षाचालकानं कोळसेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने तपास करत चार जणांना बेड्या ठोकल्या (4 Accused arrest) आहेत. अद्याप एक आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
जावेद शेख असं 19 वर्षीय फिर्यादी रिक्षाचालकाचं नाव आहे. तो अंबरनाथ पश्चिमेतील कमलाकर नगर परिसरातील रहिवासी आहे. घटनेच्या दिवशी बुधवारी रात्री जावेद अंबरनाथ बस स्थानक परिसरात रिक्षा घेऊन उभे होते. यावेळी याठिकाणी एक महिला आणि पुरुषाने कल्याणला जायचं असल्याचं सांगत रिक्षात बसले. काही अंतर दूर गेल्यानंतर संबंधित प्रवाशांनी जावेदला कल्याण पूर्वेकडील रेल्वे क्वार्टर्सकडून रिक्षा घेऊन जाण्यास सांगितलं. आरोपींनी याठिकाणी अन्य दोन साथीदारांना रिक्षात बसवलं.
हेही वाचा-50 रुपयांसाठी पोटच्या मुलाला मारहाण, डोक्याची कवटी फुटल्याने तडफडून मृत्यू
दरम्यान, काटेमानिवली ब्रिजवरून पश्चिमेस जात असताना एका आरोपीनं रिक्षाचालक जावेदच्या मानेवर सुरा ठेवला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर आरोपींनी जबरदस्ती करत रिक्षा केडीएमसीच्या ड प्रभाग कार्यालयासमोर आणली. याठिकाणी असलेल्या एका आरोपीसह पाचही जणांनी जावेदला लाकडी दांडक्यानं, दगडानं मारहाण केली. तसेच त्याच्याकडील रिक्षा आणि खिशातील पाचशे रुपये असलेले पाकीट, मोबाइल हिसकावून पळ काढला.
हेही वाचा-पत्नीच्या मदतीने पतीचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार; माणुसकीला हादरवणारी घटना
रात्री उशिरा घडलेल्या थरारक घटनेनंतर रिक्षाचालक जावेद याने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या अधारे अवघ्या सहा तासांत चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. एक आरोपी फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी करण दखनी, चैताली पाटील, कुणाल जाधव आणि एका अल्पवयीन मुलास अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.