जाहिरात
मराठी बातम्या / देश / धक्कादायक! पत्नीच्या मदतीने पतीचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार; माणुसकीला हादरवणारी घटना

धक्कादायक! पत्नीच्या मदतीने पतीचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार; माणुसकीला हादरवणारी घटना

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Crime News: चर्चच्या पाद्रीने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या कळस (church’s father raped minor girl) गाठला आहे. नराधम आरोपीनं पीडित मुलीला ब्लॅकमेल (Blackmail) करत तिच्यावर अनेकदा अत्याचार केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

गांधीनगर, 01 जानेवारी: चर्चच्या पाद्रीने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या कळस (church’s father raped minor girl) गाठला आहे. नराधम आरोपीनं पीडित मुलीला ब्लॅकमेल (Blackmail) करत तिच्यावर अनेकदा अत्याचार केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीच्या पत्नीनं देखील या काळ्या कृत्यात त्याला साथ दिली आहे. नराधम आरोपी पीडित मुलीवर बलात्कार करत असताना, आरोपी महिला संबंधित विकृत कृत्याचा व्हिडीओ मोबाइलमध्ये शूट (Shoot obscene videos) करत होती. गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चचा पाद्री अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेचा शिकार बनवत होता. अखेर आरोपींच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. गुन्हा दाखल (FIR lodged) झाल्यानंतर या धक्कादायक घटनेला वाचा फुटली. पोलिसांनी नवरा आणि बायकोला अटक केली (Accused couple arrested) आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. बळीराम कोकणी आणि अनिता कोकणी असं अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. संबंधित दोघंही दक्षिण गुजरातमधील तापी जिल्ह्यातील रहिवासी आहे. हेही वाचा- सख्खं नातंही विसरला नराधम; औरंगाबादेत अल्पवयीन बहिणीवर भावाकडून अत्याचार आरोपी बळीराम कोकणी हा सोनगढ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चर्चमध्ये पाद्री आहे. त्याने गावातील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केला आहे. या कृत्यात त्याची पत्नी अनिता हिने देखील नराधमाला मदत केली आहे. दोघांनी पीडित मुलीचा अश्लील व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल करत अत्याचार सहन करण्यास भाग पाडलं आहे. या प्रकरणी सोनगढ पोलिसांनी  दोघांना अटक केली आहे. हेही वाचा- पार्टीला बोलावून होणाऱ्या बायकोसोबत विकृत कृत्य; मग विचित्र कारण देत मोडलं लग्न पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही तिच्या आजीसोबत आरोपी पाद्री बळीरामच्या शेतात मजुरीसाठी जात होती. तसेच ती आपल्या आई-वडिलांसोबत चर्चमध्ये देखील यायची. त्यामुळे तिची आरोपी पाद्रीशी चांगली ओळख होती. या ओळखीचा फायदा घेत आरोपीनं पीडितेवर ती शेतात कामासाठी आली असता तिच्यावर बलात्कार केला. आरोपीनं पाद्रीने पीडितेला शेतात बांधलेल्या एका झोपडीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला आहे. यावेळी पाद्रीची पत्नी अनिता देखील तिथे उपस्थित होती. तिने पीडित मुलीवर होणाऱ्या अत्याचाराचा व्हिडीओ शूट केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात