मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /संतापजनक ! 50 रुपयांसाठी पोटच्या मुलाला अमानुष मारहाण, डोक्याची कवटी फुटल्याने चिमुकल्याचा मृत्यू

संतापजनक ! 50 रुपयांसाठी पोटच्या मुलाला अमानुष मारहाण, डोक्याची कवटी फुटल्याने चिमुकल्याचा मृत्यू

Father killed son allegedly stealing Rs 50 from home: 10 वर्षीय मुलाने घरातून 50 रुपये चोरल्याने त्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. वडिलांनी केलेल्या मारहाणीत चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Father killed son allegedly stealing Rs 50 from home: 10 वर्षीय मुलाने घरातून 50 रुपये चोरल्याने त्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. वडिलांनी केलेल्या मारहाणीत चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Father killed son allegedly stealing Rs 50 from home: 10 वर्षीय मुलाने घरातून 50 रुपये चोरल्याने त्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. वडिलांनी केलेल्या मारहाणीत चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

ठाणे, 1 जानेवारी : वडिलांनीच आपल्या पोटच्या मुलाला बेदम मारहाण (Father beats son) केली आहे. या मारहाणीत 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू (10 year old child died) झाला आहे. ही घटना ठाणे जिल्ह्यातील कळवा शहरात (Kalwa City of Thane) घडली आहे. वडिलांनीच पोटच्या मुलाची हत्या केल्याच्या घटनेने एकछ खळबळ उडाली आहे. (Thane man beat own son for Rs 50)

हत्येचं कारण....

आपल्या मुलाने घरातून 50 रुपये चोरल्याच्या रागातून वडिलांनी चिमुकल्याला मारहाण केली. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी या मुलाचे वडील दारूच्या नशेत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आरोपी संदीप उर्फ बबलू प्रजापती याला पोलिसांनी अटक केली आहे. कळव्यातील वाघोबानगर परिसरात ही घटना घडली आहे.

वाचा : पार्टीला बोलावून होणाऱ्या बायकोसोबत विकृत कृत्य; मग विचित्र कारण देत मोडलं लग्न

ही घटना 29 डिसेंबर रोजी घडली आहे. मुलाने 50 रुपये चोरळ्याच्या रागातून संदीप प्रजापती याने आपल्या 10 वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत मुलाच्या डोक्याची कवटीच फुटली. तसेच हातालाही फ्रॅक्चर झाले असल्याचं समोर आलं. या मारहाणीत चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले. तर मुलाला कळव्यातील छत्रपती शिवाजी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कळव्यातील या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

बाळाला औषध देताना आईकडून घडली मोठी चूक

काही दिवसांपूर्वी कळव्यातून एक धक्कादायक वृत्त घडल्याचं समोर आलं होतं. येथे पाच महिन्याच्या बाळाचा पाण्याने भरलेल्या ड्रममध्ये मृतदेह सापडल्यानंतर गोंधळ उडाला. पोलिसांनी या प्रकरणात रविवारी बाळाच्या आईला अटक केली आहे. बाळाच्या आईवर मुलाची हत्या करणे आणि पुरावे मिटवण्याचा आरोप आहे.

या बाळाच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, बाळाचं महात्मा फुले नगर येथील घरातून अपहरण करण्यात आलं होतं. ज्यानंतर कळवा पोलिसांनी प्रकरण सोडवण्यासाठी एका टीमचं गठण केलं. दुसऱ्यादिवशी सकाळी बाळाचा मृतदेह त्याच्या घराजवळील पाण्याने भरलेल्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये सापडला. साहाय्यक पोलीस आयुक्तांनी सांगितलं की, त्यांनी जवळीस सीसीटीव्ही फुटेज चेक केलं आणि बाळाच्या कुटुंबासह शेजारच्यांनी चौकशी केली. यावेळी समोर आलं की, बाळ सारखं सारखं आजारी पडत होतं. बाळाच्या आईचं नाव शांताबाई चव्हाण असून तिच त्याला औषधं देत होती. मात्र तिच्याकडून चूक झाली आणि तिने बाळाला औषधांचा हाय डोस दिला. यातच बाळाचा मृत्यू झाला.

First published:

Tags: Crime, Murder, Thane