नवी दिल्ली, 07 फेब्रुवारी : 'सध्या सरकारचे सत्कार समारंभ आणि लग्न सोहळे सुरू आहेत. वरळी मतदारसंघात 32 वर्षाच्या आदित्य ठाकरे यांनी आव्हान दिले. आता वरळी मध्ये मुख्यमंत्री शिंदे हे उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पण घेऊन येत आहेत, मुख्यमंत्री पोलीस घेऊन येणार पण त्यांनी राजीनामा देऊन यायला हवं, आम्ही संध्याकाळपर्यंत वाट पाहू, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला.
वरळी मतदारसंघामध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे. यावरून संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.
आता वरळीमध्ये मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री यांना पण घेऊन येत आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे पोलीस घेऊन येणार पण त्यांनी राजीनामा देऊन यायला हवं, आम्ही संध्याकाळपर्यंत वाट पाहू. मुळात भाजपला मध्ये पडण्याची गरज नाही. याला चोमडेपणा म्हणतात, स्वत: मुख्यमंत्री शिंदे यांनी आम्ही मोदींची माणसं आहोत, असं म्हणाले आहे. त्यामुळे मोदी सेना येणार आहे. त्यामुळे भाजपने यात उतरू नये, असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला.
भाजप धडपड सुरू आहे, निवडणुका होऊ नये म्हणून धडपड सुरू आहे. कसबा आणि चिंचवडमध्ये भाजपची अस्वस्था दाखवत आहे. भाजपसाठी चांगले चित्र नाही. मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्यासबद्दल संपूर्ण सहानभुती आहे. पण निवडणुका या अपिहार्य आहे, असंही राऊत यांनी स्पष्टपणे सांगितलं.
'विदर्भातून अनेक प्रकल्प बाहेर गेले आहेत. महाराष्ट्रातील प्रकल्प बाहेर गेल्याबाबत आज मुख्यमंत्री वरळी सभेत का बोलणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष आहे. हा चौथा मोठा प्रकल्प आहे जो महाराष्ट्रातून बाहेर गेला आहे, असंही राऊत म्हणाले.
(तुम्ही काय मला मुर्ख समजता का? अजित पवार 'त्या' प्रश्नावर भडकले, VIDEO)
पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक जास्त आहे त्यामुळे त्यांनी ती जागा मागितली. आम्ही महाविकास आघाडी उमेदवार निवडून आणू. नाना काटे यांना आम्ही ओळखतो. आम्ही सगळे मदत करू, असंही राऊत म्हणाले.
राज्यपाल नियुक्तीबाबत घटनाबाह्य पद्धतीने निर्णय घेतले तर बघावं लागेल. नारायण राणे राज्यपाल झाले तर मजा येईल, असा टोलाही राऊतांनी लगावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sanjay raut