जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / Chinchwad by-election : भाजपची विनंती आणि राज ठाकरेंच्या पत्राला केराची टोपली, राष्ट्रवादीकडून अखेर चिंचवडमध्ये उमेदवार जाहीर

Chinchwad by-election : भाजपची विनंती आणि राज ठाकरेंच्या पत्राला केराची टोपली, राष्ट्रवादीकडून अखेर चिंचवडमध्ये उमेदवार जाहीर

चिंचवड पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून कुणाला उमेदवारी मिळणार अशी चर्चा रंगली होती. अखेर

चिंचवड पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून कुणाला उमेदवारी मिळणार अशी चर्चा रंगली होती. अखेर

चिंचवड पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून कुणाला उमेदवारी मिळणार अशी चर्चा रंगली होती. अखेर

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पिंपरी चिंचवड, 07 फेब्रुवारी : पुण्यातील चिंचवड पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून कुणाला उमेदवारी मिळणार अशी चर्चा रंगली होती. अखेर यावरून पडदा आता बाजूला झाला आहे. राष्ट्रवादीकडून नाना काटे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे कसबा आणि चिंचवडमध्ये पोटनिवडणूक होणारच हे आता शिक्कामोर्तब झालं आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाना काटे हे उमेदवार असतील, अशी घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.

जाहिरात

महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र काम करून या निवडणुकीत आम्ही नक्कीच विजयी होऊ, असा आम्हाला विश्वास आहे, असंही जयंत पाटील म्हणाले. विशेष म्हणजे, आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. कसब्यात काँग्रेसकडून उमेदवार ठरला आहे. तर चिंचवडमध्ये शेवटच्या क्षणी काटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. (तुम्ही काय मला मुर्ख समजता का? अजित पवार ‘त्या’ प्रश्नावर भडकले, VIDEO) भाजपची विनंती फेटाळली दरम्यान, मंगळवारी अर्ज दाखल करत असतानाच उमेदवाराची घोषणा होईल, असं अजित पवार यांनी सोमवारी रात्रीच सांगितलं. तसंच ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला संपर्क केला, तसंच चंद्रशेखर बावनकुळे यांनीही आपल्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. ( शेवटच्या क्षणी दिल्लीतून काँग्रेसची घोषणा, कसब्यात हा उमेदवार भरणार आज अर्ज ) अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक बिनविरोध झाली असली तरी पंढरपूर, कोल्हापूर आणि देगलूरची पोटनिवडणूक बिनविरोध झाली नाही, याची आठवण अजित पवार यांनी करून दिली. कसब्यातून रवींद्र धंगेकरांना उमेदवारी कसबा पोटनिवडणूक कोण लढवणार यावरून अखेर पडदा बाजूला झाला आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसला कसबाची जागा सोडण्यात आली आहे. रवींद्र हेमराज धंगेकर यांच्या नावाची घोषणा दिल्ली हायकमांडकडून करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात