मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /रिलायन्स फाऊंडेशनतर्फे मुंबई पोलिस दलाला 10 RANGER 570 efi गाड्यांची भेट, समुद्रकिनारी गस्त घालणं होणार सोपं

रिलायन्स फाऊंडेशनतर्फे मुंबई पोलिस दलाला 10 RANGER 570 efi गाड्यांची भेट, समुद्रकिनारी गस्त घालणं होणार सोपं

दणकट, अद्यावत, वापरायला सोप्या आणि भरपूर फायदेशीर अशी मुंबई पोलिसांच्या दलात समाविष्ठ झालेल्या या खास RANGER 570 efi गाड्यांची वैशिष्ट्य आहेत.

दणकट, अद्यावत, वापरायला सोप्या आणि भरपूर फायदेशीर अशी मुंबई पोलिसांच्या दलात समाविष्ठ झालेल्या या खास RANGER 570 efi गाड्यांची वैशिष्ट्य आहेत.

दणकट, अद्यावत, वापरायला सोप्या आणि भरपूर फायदेशीर अशी मुंबई पोलिसांच्या दलात समाविष्ठ झालेल्या या खास RANGER 570 efi गाड्यांची वैशिष्ट्य आहेत.

मुंबई, 07 जून : तौक्ते सारख्या चक्रीवादळात (Cyclone Tauktae) समुद्र किनाऱ्यांवर (Beach) टेहळणी आणि बचाव कार्य करण्यासाठी विशेष वाहनांची (Special Vehicle) गरज असते. अशाच 10 RANGER 570 efi गाड्यांचं मुंबई पोलिस (Mumbai Police) दलात आगमन झालं आहे. सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या (CM Uddhav Thakeray) हस्ते या गाड्या पोलिस दलात सहभागी करण्यात आल्या. मुंबईला (Mumbai) समुद्र किनाऱ्यांनी वेढलेलं आहे. तसंच मुंबईदेखिल सतत दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असते. त्यामुळं समुद्रावर गस्त घालण्यासाठी मुंबई पोलिसांना या गाड्यांचा मोठा फायदा होऊ शकणार आहे.

(वाचा-Pune Fire : प्युरीफायर कंपनीला भीषण आग; 17 कामगार बेपत्ता, 7 मृतदेह काढले)

रिलायन्स फाऊंडेशनतर्फे देण्यात आलेल्या या अद्यावत गाड्यांचा वापर बीच पेट्रोलिंगसाठी केला जाणार आहे. ज्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये समुद्र किनारे येतात अशा सर्व पोलिस ठाण्यांना ही नवी अद्ययावत वाहनं दिली जाणार आहेत. त्यामुळं समुद्र किनाऱ्यांवर गस्त घालणं आणि बचावकार्य करणं आणखी सोपे होणार असल्याचा विश्वास मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी व्यक्त केला आहे.

(वाचा-पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य मिळणार- PM)

पॉवर स्टेअरिंग, अ‍ॅडजस्टेबल स्टेअरिंग, स्टॅंडर्ड 2 मोड, भरपूर स्पेस, गॅस असिस्टंट डम्प बॉक्सक्स आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खडकाळ किंवा भुसभुशीत अशा कोणत्याही भागात अडकू नये यासाठी वेर्सा ट्रॅक टर्फ मोडही या गाडीत देण्यात आला आहे. त्यामुळं समुद्र किनारी गस्त घालणं मुंबई पोलिसांना अधिक सोयीस्कर जाणार आहे. दणकट, अद्यावत, वापरायला सोप्या आणि भरपूर फायदेशीर अशी मुंबई पोलिसांच्या दलात समाविष्ठ झालेल्या या खास RANGER 570 efi गाड्यांची वैशिष्ट्य आहेत.

रिलायन्स फाऊंडेशनतर्फे मुंबई पोलिसांना या गाड्या देण्यात आल्या आहेतक. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरवी झेंडी दाखवत या गाड्या दलात दाखल केल्या मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर झालेल्या या गाड्यांच्या अनावरणाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलिप वळसे पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई मनपाच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह खासदार अरविंद सावंत आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या सिराज कोतवाल हे उपस्थित होते.

First published:

Tags: Mumbai, Mumbai News, Mumbai police, Uddhav thackeray