पुणे, 07 जून : पुण्याच्या मुळशी तालुक्यातील (Pune Mulshi) एका कंपनीला भीषण आग (Fire) लागली असून या आगीमध्ये मरण पावलेल्यांचा आकडा 17 वर पोहोचला आहे. याठिकाणी काम करणाऱ्या 37 कामगारांपैकी (Workers ) 20 जणांना वाचवण्यात यश आल्याची महिती मिळाली आहे. त्यापैकी काही जण जखमी असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला कामकारांचा समावेश असल्याचं समोर आलं आहे. केमिकल तयार करणाऱ्या या कंपनीमध्ये लागलेली आग पसरत गेली आणि त्यामुळं भीषण दुर्घटना घडल्यानं 17 जणांना प्राण गमवावे लागले आहेत.
#Pune : पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यातल्या सॅनिटायझर तयार करणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली आहे. किमान 15 -17 मजूर आत अडकल्याची भीती आहे. प्राथमिक माहितीनुसार 7 जणांचा मृत्यू झाला आहे.#MulshiFire pic.twitter.com/rGTPaTTi4X
— News18Lokmat (@News18lokmat) June 7, 2021
(वाचा-पुण्यात कोट्यवधींची जागा भाडेतत्त्वावर देण्याचा भाजपचा घाट,अजितदादा कुणासोबत?)
मुळशी तालुक्यामध्ये असलेल्या अरवडे गावाजवळ ही घटना घडली आहे. वॉटर प्युरिफायरसाठी लागणारं केमिकल तयार करणाऱ्या कंपनीला ही भीषण आग लागल्याची माहिती आहे. या कंपनीमध्ये जवळपास 37 मजूर काम करत होते. त्यापैकी 17 मजूर मृत्यूमुखी पडले आहेत. इतर 20 जणांना वाचवण्यात यश आलं असून त्यांच्यापैकी काही जखमींवर उपचार सुरू आहेत. अग्निशमन दलाचे 8 बंब घटनास्थळी दाखल झाले. त्याद्वारे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. कंपनीत अडकलेल्या मजुरांची सुटका करण्यासाटी JCB च्या साह्याने भिंती फोडून त्यांना बाहेर काढण्याचाही प्रय्तन करण्यात आला. तहसीलदार अभय चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली.
अतिशय दु:खद! उरवडे,मुळशी येथे एका कंपनीत लागलेल्या आगीत काही कामगारांचा मृत्यु झाला.ही घटना अतिशय वेदनादायी आहे.मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली.जखमींवर उपचार सुरु असून ते सुखरुप घरी परतावेत ही प्रार्थना.
— Supriya Sule (@supriya_sule) June 7, 2021
(वाचा-कोरोनानं बापलेकाचा घेतला घास; घरातील कर्ती माणसं गमावल्यानं कुटुंब पोरकं)
या कंपनीमध्ये लागलेल्या आगीच्या कारणाचा शोध घेतला असता, पॅकिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टीकमुळं आग लागल्याचं समोर येत आहे. या प्लास्टीकमुळं आग लागली आणि काही वेळातच आग वाढत गेल्यानं तिच्यावर नियंत्रण मिळवणं शक्यच झालं नाही. कंपनीमध्ये वॉटर प्युरिफायरसाठीच्या केमिकलचं उत्पादन केलं जातं. आग मोठ्या प्रमाणावर भडकली त्यामुळं अनेक मजूर आतमध्ये अडकले होते. याठिकाणी 37 मजूर काम करत होते. त्यापैकी जवळपास 17 मजुरांचा मृत्यू झाल्यानं संपूर्ण परिसरामध्ये शोककळा पसरली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.