गुवाहाटी 26 जून : विधानसभा उपाध्यक्षांनी 16 बंडखोर आमदारांना नोटीस पाठवली आहे. 16 बंडेखोर आमदारांना निलंबनाची नोटीस पाठवल्याने त्यांचं सदस्यत्व धोक्यात आलं आहे. सोमवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उत्तर देण्याची वेळ या आमदारांना देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 16 जणांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. सिल्व्हर ओकवरील बैठकीत आक्रमक रणनीती; एकनाथ शिंदे गटाचं संख्याबळ तोडण्याचा शरद पवारांचा प्रयत्न? या नोटीसवर आता एकनाथ शिंदे गट आक्षेप घेत आहे. यामुळे बंडखोर आमदारांना दिलेल्या नोटिसांवर कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील हा सत्तासंघर्ष आणखी काही वाढू शकतो. बंडखोर आमदार उत्तर देण्यासाठी ७ दिवसांची मुदत एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोरी करणाऱ्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्यात यावं अशा आशयाची मागणी शिवसेनेकडून उपाध्यक्षांकडे करण्यात आली आहे. या 16 आता नोटीस पाठवण्यात आली आहे. आमदारांना त्यांची बाजू मांडण्यासाठी सोमवारपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या आमदारांनी त्यांचं मत न मांडल्यास त्यांना अपात्र ठरववलं जाईल, असं सांगितलं जात आहे.़़ झाडी..डोंगर..हॉटेल आता विसरा, बॅगा भरा! आमदार 48 तासांत मुंबईत येणार? या बंडखोर आमदारांना परत पक्षात घ्यायचं का नाही ते आता उद्धव ठाकरे ठरवतील असंही अरविंद सावंत यांनी सांगितलं. या आमदारांचा एक वेगळा गट होऊ शकत नाही, त्यांना भाजपमध्ये विलिनीकरण करावं लागेल. मग ते कट्टर शिवसैनिक आहेत ही जी काही डॉयलॉगबाजी ते करत होते ती बंद होईल असंही अरविंद सावंत म्हणाले. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी 12 च्या सुमारास आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये ज्येष्ठ विधिज्ञ आणि आमदारांमध्ये सल्लामसलत होणार आहे. विधानसभा उपाध्यक्षाकडून गटनेता आणि प्रतोद नियुक्तीचा निर्णय न झाल्यामुळे ही बैठक बोलावण्यात आली आहे. त्यामुळे आता गटनेता नियुक्तीचा वाद हा आता राज्यपालांकडे जाण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.