Home /News /money /

1 एप्रिलपासून बदलणार PAN, आयकर आणि GST संदर्भातील नियम, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

1 एप्रिलपासून बदलणार PAN, आयकर आणि GST संदर्भातील नियम, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष (Financial Year 2020-21) सुरू होत आहे. नवीन आर्थिक वर्षात काही नियमही बदलणार आहेत. GST, पॅनकार्ड आणि आयकरसंबधी नियम बदलणार असल्यामुळे तुमच्या दैंनदिन आयुष्यावर याचा परिणाम होणार आहे.

    नवी दिल्ली, 07 मार्च : 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष (Financial Year 2020-21) सुरू होत आहे. नवीन आर्थिक वर्षात काही नियमही बदलणार आहेत. GST, पॅनकार्ड आणि आयकरसंबधी नियम बदलणार असल्यामुळे तुमच्या दैंनदिन आयुष्यावर याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे जाणून घ्या 1 एप्रिलपासून कोणत्या नियमांमध्ये बदल होणार आहे. पॅन-आधार कार्ड (PAN-Aadhar Card) पॅन कार्ड आधार सोबत जोडण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2020 आहे. त्यामुळे आयकर विभागाकडून नागरिकांना इशारा देण्यात आला आहे की, 31 मार्चपर्यंत जर तुम्ही आधार कार्ड आणि पॅन कार्ड (Pan Aadhaar Link Mandatory) नाही केलं, तर पॅन कार्ड संबंधित सर्व काम थांबवण्यात येतील आणि पॅन कार्डदेखील रद्द करण्यात येईल. कारण याआधीही आधार-पॅन लिंक करण्याची तारीख (PAN Aadhaar Link Deadline) अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. (हे वाचा- येस बँकेला रुळावर आणण्यासाठी सरकारचा प्लान तयार, SBI करणार मोठी गुंतवणूक) आता आधार-पॅन लिंक करण्याची शेवटची तारीख  31 मार्च आहे. आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार 31 मार्चनंतर सुद्धा तुमचं पॅन कार्ड आधारसोबत जोडता येईल, मात्र जोपर्यंत तुम्ही लिंकिगची प्रक्रिया पूर्ण करणार नाही तोपर्यंत तुमचं पॅनकार्ड इन-ऑपरेटिव्ह अर्थात निष्क्रिय राहील. नवीन करप्रणाली (Income Tax New Systems) केंद्रीय अर्थसंकल्पात (Budget 2020-21) केंद्र सरकारने पर्यायी दर आणि टॅक्स स्लॅबसह नवीन आयकर प्रणाली लागू केली आहे. 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.  नवीन कर प्रणालीत कोणत्याही सूट आणि कपातीचा कोणताही फायदा होणार नाही. नवीन कर प्रणाली वैकल्पिक आहे म्हणजेच जर करदाता इच्छुक असेल तर तो जुन्या कर स्लॅबनुसार प्राप्तिकर भरू शकतो. त्याचबरोबर नव्या करप्रणालीअंतर्गत वार्षिक पाच लाख रुपये उत्पन्न असणाऱ्याना कोणताही कर भरावा लागणार नाही. (हे वाचा-येस बँकेच्या खातेधारकांवर कोसळली कुऱ्हाड, फक्त 50 हजार काढण्याची मुभा) 5 ते 7.5 लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांसाठी कर दर 10%, 7.5 ते 10 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 15%, 10 लाख ते 12.5 लाखांवर 20%, 12.5 लाख ते 15 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 25% आणि 15 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30% दराने कर आकारला जाईल. वीन जीएसटी रिटर्न (New GST Return) जीएसटी काउंसिलच्या 31व्या बैठकीमध्ये टॅक्सपेअर्ससाठी नवीन जीएसटी रिटर्न सिस्टिम घेऊन येण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 1 एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी होईल. यामुळे जीएसटी रिटर्न भरणं अधिक सोपं होणार आहे. नवीन व्यवस्थेअंतर्गत 2 नवीन फॉर्म असणार आहेत. GST FORM ANX-1 आणि GST FORM ANX-2. परदेशी टूर पकेजसाठी TCS 1 एप्रिल 2020 पासून विदेशी टूर पॅकेज खरेदी करणे आणि परदेशामध्ये कोणताही फंड खर्च करणे महाग होणार आहे.  जर कोणी परदेशी टूर पॅकेज विकत घेत असेल किंवा परकीय चलन एक्सचेंज करत असेल तर त्या व्यक्तीला 7 लाखांहून अधिक रकमेवर टीसीएस अर्थात टॅक्स कलेक्टेड अट सोअर्स द्यावा लागेल. वाहन नियम 1 एप्रिलपासून देशात केवळ BS-6 मानक वाहनेच विक्री केली जातील. सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर 2018 मध्ये आदेश दिला होता की BS-4 मानक असणारी नवीन वाहनं 31 मार्च 2020 नंतर विकली जाणार नाहीत. BS-4 वाहने विकण्यासाठी ऑटोमोबाईल कंपन्या अनेक ऑफर घेऊन आल्या आहेत. औषधांशी संबंधित नियम बदलतील सरकारने सर्व वैद्यकीय उपकरणं (Medical Devices) औषधं म्हणून घोषित केली आहेत. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी एक अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार मानव आणि प्राण्यासाठी वापरण्यात येणारी उपकरणांनाही ड्रग्ज म्हणजेच औषधं संबोधण्यात येतील. त्यानंतर ड्रग्स अँड कॉस्मेटिसिस कायदा, 1940च्या (23 of 1940)  कलम 3  अंतर्गत या उपकरणांना ड्रग्स म्हणून वर्गीकृत केले जाईल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Budget 2020, GST, Income tax

    पुढील बातम्या