Home /News /money /

Infosys च्या 3 सॉफ्टवेअर इंजिनीअरना अटक; करदात्यांनाच लुबाडलं

Infosys च्या 3 सॉफ्टवेअर इंजिनीअरना अटक; करदात्यांनाच लुबाडलं

IT विभागाचं काम करताना मिळालेल्या करदात्यांच्या माहितीचा गैरवापर करत इन्फोसिसच्या इंजिनीअर्सनी करदात्यांनाच लुबाडण्याचा प्रयत्न केला.

    बंगळुरू, 9 मार्च : इन्कम टॅक्स (IT) रिबेट मिळवून देतो, असं सांगत इन्फोसिसच्या (Infosys) तीन सॉफ्टवेअर इंजिनीअर्सनी काही करदात्यांकडून (Tax Payers)पैशाची मागणी केल्याचं उघड होत आहे. आयकर (IT department)विभागाने आपल्या काही सॉफ्टवेअर संबंधित सेवा इन्फोसिसकडून घेतल्या आहेत. त्यामुळे करदात्यांची माहिती इन्फोसिसच्या इंजिनीअर्सच्या हाती लागली. त्याचा गैरवापर करत इन्फोसिसच्या बंगळुरू कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांनी करदात्यांना लुबाडण्याचा प्रयत्न केला. तो वेळीच उघडकीस आल्यामुळे मोठी फसवणूक टळली. तीनही कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. कर परतावा (Tax Rebate)मिळवायची असेल तर पैसे द्या, असं म्हणत या कर्मचाऱ्यांनी काही करदात्यांना फोन केले, असं उघडकीस आलं आहे. वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी माहितीनुसार, इन्कम टॅक्स विभाग (IT department )आयकर विभागाचा इन्फोसिसबरोबर करार झाला होता. त्यानुसार काही सॉफ्टवेअर सेवा इन्फोसिसतर्फे पुरवण्यात येत होत्या. या कराराचा भाग म्हणून इन्कम टॅक्स विभागाकडे असणारी करदात्यांची माहिती (डेटा)इन्फोसिसकडे देण्यात आला होता. संबंधित - YES Bank ग्राहक अद्यापही नाही काढू शकत एटीएममधून पैसे, बँकेने दिलं हे उत्तर या डेटाचा अॅक्सेस मिळाल्यानंतर तीन सॉफ्टवेअर इंजीनिअरर्सनी त्याचा गैरवापर करत करदात्यांना लुबाडण्याची योजना आखली. 4 टक्के इन्कम टॅक्स रिबेट हवा असेल तर अमूक एक पैसे भरा असे फोन हे तीन कर्मचारी काही टॅक्स पेअर्सना करत होते. आयकर विभागाकडे अशा फोनसंबंधी करदात्यांकडून तक्रार गेल्यानंतर प्रकरण उघडकीस आलं. अशा प्रकारचे फोन इन्फोसिसच्या इंजिनीअरर्सनी केल्याचं कळलं आणि त्यांच्याविरोधात पोलीस कारवाई करण्यात आली. आतापर्यंत या तीन सॉफ्टवेअर इंजिनीअर्सनी काही लोकांना असंच लुटल्याच उघड झालं आहे. त्यांनी अशा गैरव्यवहारातून महिन्याभरात 4 लाख रुपये कमावल्याचं पोलिसांनी सांगितलं. ते पैसे त्यांच्याकडून वसूल करण्यात आले आहेत. या तीन कर्मचाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्य बातम्या मानले साहेब! कार्यकर्ते झोपले बेडवर, तर आमदारांनी जमिनीवर अंथरली सतरंजी अभिनेते शरद पोंक्षे यांच्या गाडीवर दगडफेक, काचा फोडून हल्लेखोर पसार
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    पुढील बातम्या